Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 31, 2026
in राजकीय
0
श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

अहिल्यानगर । प्रशांत बाफना
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय समीकरणे विशेष चर्चेत आली आहेत. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून एकमेकांचे राजकीय विरोधक मानले जाणारे नेते एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याने सहकार क्षेत्रातील निवडणुकीला नवे वळण मिळाले आहे. मात्र, एका बाजूला नेत्यांची एकजूट आकार घेत असताना दुसऱ्या बाजूला विरोधी गटानेही आपली ताकद कायम ठेवल्याने श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच श्रीगोंदा तालुक्यातील दत्ता पानसरे व सचिन जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

श्रीगोंदा तालुक्यात सुरुवातीला जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून वेगळेच राजकीय चित्र पाहायला मिळत होते. आमदार विक्रम पाचपुते आणि राजेंद्र नागवडे यांच्या राजकीय भूमिकांना विरोध करणाऱ्या राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार यांच्यासह अन्य नेत्यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने निवडणुकीतील संघर्ष वाढण्याची चिन्हे होती. सोसायटी मतदारसंघातही चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.मात्र, निवडणुकीच्या हालचालींना वेग येताच पडद्यामागील राजकीय चर्चांनी जोर धरला. राहुल जगताप यांनी माघार घ्यावी, यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांच्या पातळीवर प्रयत्न झाल्याची चर्चा होती. त्यानंतर राहुल जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात झालेल्या बैठकीने राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले. जगताप यांनी दत्तात्रय पानसरे यांचे नाव पुढे केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

या घडामोडीनंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी मध्यस्थी करत राहुल जगताप, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नहाटा, अतुल लोखंडे आणि राजेंद्र नागवडे यांच्यात समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. पिंपळगाव पिसा येथे झालेल्या बैठकीतून या राजकीय एकजुटीला आकार मिळाल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, आमदार विक्रम पाचपुते, राजेंद्र नागवडे आणि राहुल जगताप हे तीनही प्रमुख नेते एकाच मंचावर दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्ष
राजकारणात वेगवेगळ्या भूमिका घेणारे नेते सहकाराच्या निवडणुकीसाठी एकत्र येत असतील, तर त्याचा परिणाम मतदारांच्या निर्णयावर कितपत होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महिला प्रवर्गात तिरंगी लढत
श्रीगोंदा तालुक्यात महिला प्रवर्गातून अनुराधा नागवडे, संध्या महाडुळे आणि सुवर्णा पाचपुते या उमेदवारांच्या नावांमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दुसरीकडे, मंजुषा गुंड, हर्षदा काकडे यांच्यासह अन्य उमेदवार आणि विरोधी गटही आपापली राजकीय ताकद दाखविण्याच्या तयारीत आहेत. तालुक्यातील एकूण 299 मतदारांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो. विविध पक्षांचे आणि गटांचे नेते एकत्र आल्याने सहकार पॅनेलची बाजू मजबूत झाल्याचे चित्र दिसत असले, तरी प्रत्यक्ष मतदानात मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतात, यावरच अंतिम निकाल अवलंबून असेल.

एकजुटीचे गणित यशस्वी ठरणार की विरोधक धक्का देणार?
जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून, आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. श्रीगोंद्यातील प्रमुख नेत्यांची संभाव्य एकजूट ही निवडणुकीतील मोठी घडामोड ठरू शकते. मात्र, विरोधी गटानेही आपली रणनीती आखली असल्याने ही लढत एकतर्फी होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. एकीकडे विखेंच्या पुढाकारातून राजकीय मनोमिलनाचे प्रयत्न, तर दुसरीकडे विरोधकांचे तगडे आव्हान-अशा दुहेरी संघर्षात श्रीगोंद्यातील मतदार कोणाला कौल देणार? नेत्यांची एकजूट मतपेटीत उतरते की विरोधक अनपेक्षित धक्का देतात, याचे उत्तर निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे

Previous Post

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..