
रावेर तालुका प्रतिनिधी- उमेश तायडे
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्याच्या नुकतेच नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या सुसज्ज प्रभारी कक्षाचे उद्घाटन जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या उद्घाटन सोहळ्यामुळे निंभोरा पोलिस ठाण्याच्या प्रशासकीय कामकाजात आणखी एक सुविधेची भर पडली आहे.
याप्रसंगी निंभोरा पोलीस स्टेशनच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी निंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनी मीरा देशमुख, सावदा पोलीस ठाण्याचे गणेश फड, फैजपुर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील, निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, ममता तडवी ,फौजदार बिजू जावरे हवालदार रिजवान पिंजारी, सुरेश आढायके, किरण चाटे किरण जाधव प्रशांत चौधरी महेंद्र महाजन गोपनी विभागाचे अमोल वाघ, योगेश चौधरी, परेश सोनवणे भूषण सपकाळे ,उमेश नरवडे सागर घुगे ,पूजा वंजारी ,रईसा तडवी, व होमगार्ड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.






