Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शेठ ला. ना. सा.विद्यालयात किशोर महोत्सवांतर्गत चित्रकला व सुंदर स्पर्धा उत्साहात संपन्न

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 8, 2025
in शैक्षणिक
0

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा या हेतूने दरवर्षी किशोर महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या “किशोर महोत्सव -25″अंतर्गत नुकतेच चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या.चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा अ, ब, क,अशा तीन गटात घेण्यात आली ,त्यात स्वच्छता अभियान,ऑपरेशन सिंदूर,भारतातील ए.आय.क्रांती या विषयावर 300 विद्यार्थांनी सहभाग घेऊन सुंदर चित्रे रेखाटली. तसेच विद्यार्थांचे हस्ताक्षर सुधारावे ,तसेच योग्य विरामचिन्हे,दोन शब्दातील योग्य अंतर,अक्षरांचा आकार,उंची या बाबत त्यांना ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत 350 विद्यार्थांनी सहभाग घेऊन विद्यार्थांनी पाठ्यपुस्तकातील गद्य उतारे लेखन केले.या स्पर्धाना शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप,ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे,पर्यवेक्षिका सौ. रमा तारे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.सुवर्णा वंजारी,उपप्रमुख सौ.स्मिता करे यांनी उपस्थिती देऊन सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चित्रकलाशिक्षक श्री.प्रेमराज सारस्वत, सौ.नीलिमा सपकाळे,श्री.आनंद पाटील,श्री.गौरव देशमुख,श्री.जावेद पटेल,हस्ताक्षर समिती प्रमुख श्री.नितीन कोष्टी,उपप्रमुख सौ. रेखा पाटील,श्री.योगेश सोनजे,सौ.संगीता कुलकर्णी,सौ.वृषाली पाटील,श्री.हीतेंद्र जोशी,श्रीमती जागृती मोराणकर आदी.तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

यावलमध्ये आदिवासींचा संताप उसळला!प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीवर आदिवासी बांधवांचा तीव्र रोष

Next Post

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तथा आरे वनपरिमंडळातील राखीव वनात प्रचंड घोटाळा?

Next Post

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तथा आरे वनपरिमंडळातील राखीव वनात प्रचंड घोटाळा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

September 5, 2026
आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

September 5, 2026
तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

September 5, 2026
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..