Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शिर्डीत साईचरणी प्रामाणिकतेचे दर्शन! सुरक्षा रक्षकाने अमेरिकन भक्ताला परत केली ९ लाखांची रोकड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 12, 2025
in सामाजिक
0

साईबाबा संस्थांनच्या सुरक्षा रक्षकाची कर्तव्यनिष्ठा; १० हजार डॉलर्स व पासपोर्ट सापडताच मूळ मालकाला केला परत

शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
श्री साईबाबांच्या मंदिरात आज माणुसकी आणि प्रामाणिकतेचा एक अत्यंत अनुकरणीय प्रसंग समोर आला आहे. साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्याने एका अमेरिकन भक्ताची हरवलेली १० हजार अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनात अंदाजे ९ लाख रुपये) असलेली बॅग तत्परतेने परत करून कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज मंदिरात श्री साईबाबांची धूप आरती संपल्यानंतर मंदिराच्या मागील परिसरात सुरक्षा कर्मचारी श्री. कृष्णा कुलकर्णी यांना एक बेवारस बॅग आढळून आली. बॅग मिळताच त्यांनी तात्काळ आसपासच्या साईभक्तांकडे चौकशी केली, मात्र कोणीही मालक न मिळाल्याने त्यांनी ती बॅग तातडीने संरक्षण कार्यालयात जमा केली.
सुरक्षा विभागाने बॅगेची तपासणी केली असता, त्यामध्ये १० हजार यूएस डॉलर्स आणि एक पासपोर्ट आढळून आला. पासपोर्टवरील ‘मोहित धवन’ (रा. अमेरिका) या नावाच्या आधारे मंदिर परिसरात त्वरित अनाउन्समेंट करण्यात आली. काही वेळातच संबंधित साईभक्त मोहित धवन यांनी संरक्षण कार्यालयात धाव घेतली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी योग्य ती पडताळणी करून रोकड आणि पासपोर्ट त्यांना सुपूर्द केला.
आपली गहाळ झालेली बॅग आणि त्यातील मोठी रक्कम सुखरूप परत मिळाल्याने मोहित धवन यांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यांनी श्री साईबाबा संस्थानचे विशेष आभार मानले असून, संस्थेच्या चोख सुरक्षा व्यवस्थेचे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे मनापासून कौतुक केले आहे.
वरिष्ठांकडून कौतुक,
सुरक्षा कर्मचारी श्री. कृष्णा कुलकर्णी यांनी दाखविलेली तत्परता, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा पाहून संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर सुरक्षा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी, साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. श्री साईबाबा संस्थानची सुरक्षा टीम भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या वस्तूंच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Previous Post

सटाणा येथील ९ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेने एरंडोल हादरले; नराधमाला कठोर शिक्षा करा!

Next Post

त्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका महापालिकेसोबत?

Next Post

त्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका महापालिकेसोबत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..