Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

ज्योती विद्यामंदिर महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नसुरक्षा रक्षक नेमणूक व सीसीटीव्ही बसविण्याची जोरदार मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 1, 2026
in शैक्षणिक
0

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर

सांगवी बुद्रुक (ता. यावल) येथील ज्योती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावल रस्त्यालगत असलेल्या या महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. मात्र, महाविद्यालयाच्या मुख्य गेटजवळ अद्याप कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच संपूर्ण शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसणे किंवा काही ठिकाणी बसविलेले कॅमेरे कार्यरत नसल्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत पालक व नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तात्काळ सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, तसेच संपूर्ण शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते नियमितपणे कार्यरत ठेवावेत, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. सध्या बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावेत, असेही निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसंबंधी कोणतीही अनुचित अथवा विपरीत घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शाळा प्रशासनावर राहील, असा गंभीर इशाराही यावेळी देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास वरिष्ठ शिक्षण अधिकारी, महिला आयोग व पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन किंवा आमरण उपोषण करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत महाविद्यालय प्रशासनाने तातडीने ठोस आणि परिणामकारक पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिक, पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात आज महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

Previous Post

चुंचाळे फाट्याजवळ चाकूच्या धाक दाखवून २४ लाखांची धाडसी लूटनोकराकडीलरोकड हिसकावलीदुचाकीवरून दोन तरुण पसार

Next Post

कानळदा येथील आदर्श विद्यालयात २३ वर्षांनी पुन्हा भरली शाळा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

Next Post

कानळदा येथील आदर्श विद्यालयात २३ वर्षांनी पुन्हा भरली शाळा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..