Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

नगरमध्ये महानगरपालिका निवडणूक प्रचारात ‘द ग्रेट खली‘ची एंट्री….

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 13, 2026
in राजकीय
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आक्रमक प्रचार करत आघाडी घेतली आहे. मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रम, बैठका आणि रॅलींच्या माध्यमातून युतीकडून प्रचाराची धार वाढवण्यात आली आहे.

या प्रचाराला अधिक गती देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती उमेदवारांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू द ग्रेट खली अहिल्यानगर शहरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचारात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, युवकांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे वेधले गेले आहे.

या भव्य प्रचार रॅलीचे नेतृत्व डॉ.सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शना खाली होणार आहे. दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रवादी युतीने प्रचारात शिस्तबद्ध नियोजन, कार्यकर्त्यांचा जोश आणि विकासाचा अजेंडा पुढे ठेवत आघाडी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच युतीचा प्रचार अधिक संघटित आणि प्रभावी होत असून, शहराच्या सर्वांगीण विकासाचा विश्वास मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून केला जाणार आहे.

दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरापासून दिल्ली गेटपर्यंत भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत भाजप आणि राष्ट्रवादी युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातून निघणारी ही रॅली प्रचारातील महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मानले जात आहे

Previous Post

नगर अर्बन बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण ; बँकेच्या ‘त्या’ संचालकांना दणका

Next Post

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

Next Post

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..