Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल पंचायत समितीत आमदार अमोल जावळे यांची अचानक धडक  गटविकास अधिकारी गैरहजर; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संतापाचा स्फोट!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 6, 2026
in शासकीय
0

उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
यावल पंचायत समिती कार्यालयात यावल–रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी अचानक भेट देत प्रशासनाची धडक तपासणी केली असता धक्कादायक चित्र समोर आले. या भेटीदरम्यान गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड या कार्यालयात गैरहजर असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे त्यांच्या गैरहजेरीबाबत कोणताही रजेचा अर्ज उपलब्ध नसल्याचेही निदर्शनास आले. या प्रकारामुळे आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.
पंचायत समितीमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी आपल्या जागेवर नसल्याचे दिसून आल्याने आमदार जावळे चांगलेच संतप्त झाले. “जनतेची कामे प्रलंबित ठेवून अधिकारी बेपत्ता राहणार असतील, तर हे अजिबात सहन केले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
स्थानिक नागरिकांकडून गटविकास अधिकारी नेहमीच कार्यालयात गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याचेही आमदारांनी नमूद केले. प्रशासनातील ही बेजबाबदार कार्यपद्धती थेट ग्रामीण विकासाच्या कामांवर परिणाम करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला.
या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली व संबंधित गटविकास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली.
अचानक झालेल्या या तपासणीमुळे पंचायत समितीतील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “कार्यालयात अधिकारी नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासन आता यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

अतिक्रमणधारकांनी घेतला आयुक्तांचा धसका दुसर्‍या दिवशी माळीवाडा, एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटवली

Next Post

पोटच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार पाचोरा तालुक्यातील नराधमा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

पोटच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार पाचोरा तालुक्यातील नराधमा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..