Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

बोरावल टाकरखेडा ग्रामपंचायत प्रकरणात मोठी कारवाई : अधिकारी सुषमा कोळी निलंबित यावल तालुक्यात खळबळ

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 12, 2026
in शासकीय
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील तापी काठावरील बोरावल बुद्रुक, बोरावल खुर्द, पिंपरी आणि टाकरखेडा येथील ग्रामपंचायतींच्या कामकाजातील अनियमिततेप्रकरणी मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सुषमा दिलीप कोळी यांना निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायत विभागात एकच खळबळ उडाली आहे.
सदर ग्रामपंचायतींच्या कार्यवाहीची तपासणी करण्यासाठी नियुक्त समितीने अभिलेखांची मागणी केली होती. मात्र आवश्यक कागदपत्रे व अभिलेख उपलब्ध न करून दिल्याने चौकशीचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही. या प्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या समितीमार्फत सादर करण्यात आला. अहवालात प्रशासकीय अनियमिततेस संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले.
या अहवालाच्या आधारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३ भाग (१) अन्वये कारवाई करत श्रीमती सुषमा कोळी यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जारी केले.
निलंबन कालावधीत त्यांना पंचायत समिती चाळीसगाव अंतर्गत ग्रामपंचायत देशमुखवाडी येथे मुख्यालयी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कठोर कारवाईनंतर यावल तालुक्यातील ग्रामपंचायत विभागात धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून, इतर ग्रामसेवक व संबंधित अधिकारी देखील प्रशासनाच्या रडारवर असल्याची चर्चा सुरू आहे. पारदर्शक कारभार व अभिलेख व्यवस्थापनाबाबत प्रशासन आता अधिक कडक भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Previous Post

राज्यात ‘माझ गांव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान…. ग्रामपंयातींना पाच कोटींचे पुरस्कार

Next Post

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपमानजनक टिप्पण्या करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाईसह नार्को टेस्ट करण्यात यावी–नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम ची मागणी

Next Post

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपमानजनक टिप्पण्या करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाईसह नार्को टेस्ट करण्यात यावी--नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम ची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

September 5, 2026
आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

September 5, 2026
तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

September 5, 2026
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..