Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री गोळीबारचा थरार; तरुण गंभीर,निवडणूक वादातून हल्ला; एकाला रिक्षासह अटक, मुख्य आरोपी फरार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 13, 2026
in क्राईम, ताज्या बातम्या
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कोठला चौक परिसरात काल मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. मुकुंदनगर येथील निवडणुकीच्या जुन्या वादातून हा हल्ला झाला असून, यात अब्रार मुख्तार शेख हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी अब्रार शेख हा आपल्या मित्रासह दुचाकीवरून जुन्या बस स्थानक परिसरात गेला होता. यावेळी आरोपी जैद सय्यद उर्फ टायप्या, जाकीर सादिक सय्यद उर्फ जाबू आणि एका अनोळखी इसमाने रिक्षामधून त्यांचा पाठलाग सुरू केला. आरोपींच्या हातात बंदूक पाहून फिर्यादीने राज चेंबरच्या दिशेने पळ काढला, मात्र आरोपींनी पाठलाग सोडला नाही. राज चेंबर जवळ आरोपी जैद सय्यद याने पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी अब्रारच्या कमरेला लागली आणि तो जागीच कोसळला.

​घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे हलवून जाकीर सादिक सय्यद याला रिक्षासह (क्रमांक एम.एच. १६ सी.ई. ००२५) ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी जैद सय्यद अद्याप फरार असून पोलीस सीसीटीव्हीच्या साहाय्याने त्याचा शोध घेत आहेत. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तोफखाना पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत

Previous Post

जळगावात वाळू डंपर सोडण्या साठी मागितली लाच 50 हजारांच्या लाच प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला ताब्यात.

Next Post

जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांत NIC ई-मेल व ई-ऑफिस वापर सक्तीचा करा– हर्षल आंबेकर यांची मागणी

Next Post

जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांत NIC ई-मेल व ई-ऑफिस वापर सक्तीचा करा– हर्षल आंबेकर यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..