Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अहिल्यानगर हादरले अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन जंगलात पाच दिवस केले अत्याचार ;तीन आरोपींना अटक

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 20, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना जिल्हा प्रतिनिधी- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यात घडली. १५ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला ५ दिवस जंगलात ठेवले आणि आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत पीडित मुलीची सुटका केली. या घटनेमुळे अहिल्यानगर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. ५ दिवसांनंतर नाशिक–सुरत रोडजवळ रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून मुलीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

१३ फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली १५ वर्षीय मुलगी घरी परत आलीच नाही. पालकांनी तात्काळ राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचा गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने हलवली. नाशिक जिल्ह्यातील जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं.

या प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास राहुरी पोलिस करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद ठेवण्यात आला होता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत

Previous Post

Next Post

दादांची ‘काळरात्र’ अन् ‘ब्लॅक बॉक्स’!

Next Post

दादांची 'काळरात्र' अन् 'ब्लॅक बॉक्स'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..