Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल पंचायत समितीतील बॅकडेटेट आदेशांचा काळाबाजार? ग्रामपंचायत कामांवर संशयाचे सावट

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 20, 2026
in शासकीय
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील विविध बांधकाम व विकासकामांमध्ये बॅकडेटेट कार्यारंभी आदेश व तांत्रिक मान्यता देत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची जोरदार चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. संबंधित कामे अपूर्ण असतानाही शासनाची दिशाभूल करून निधी काढण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे.
माहितीनुसार, यावल पंचायत समिती अंतर्गत ग्रामनिधी, १५ वा वित्त आयोग तसेच इतर विकासकामांना बॅकडेटेट दाखवत कार्यारंभी आदेश आणि तांत्रिक मान्यता देण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या आदेशांवर त्या काळातील कार्यरत अभियंत्यांच्या सहीने मंजुरी देण्यात आल्याचा आरोप समोर येत आहे.
सदर अभियंता सध्या रावेर येथील बांधकाम विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असताना देखील त्यांच्या कार्यकाळातील यावल पंचायत समिती अंतर्गत मंजूर कामांना बॅकडेटेट दाखवून आदेश देण्यात आल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे हा प्रकार केवळ प्रशासकीय त्रुटी नसून मोठ्या प्रमाणात काळाबाजार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक कामे प्रत्यक्षात अपूर्ण असतानाही कागदोपत्री पूर्ण दाखवून निधी काढला गेला असल्याचा संशय आहे. यामुळे शासनाची दिशाभूल होत असून सार्वजनिक निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित काळातील कार्यरत अभियंत्याचा “खरा चेहरा” समोर येत असल्याचे बोलले जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. आता या गंभीर आरोपांवर जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी व सामान्य प्रशासन विभाग कोणती कारवाई करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
प्रश्न अनुत्तरितच:
अपूर्ण कामांवर निधी कसा काढला गेला?
बॅकडेटेट तांत्रिक मान्यता देण्यामागे कोण?
संबंधित अभियंत्यावर चौकशी होणार का?
शासन निधीच्या वापराची स्वतंत्र तपासणी होणार का?
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. यामुळे यावल तालुक्यातील विकासकामांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Previous Post

आरोग्य विभागातील मनमानीचा पर्दाफाश?प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाचा आरोप

Next Post

यावल पंचायत समिती बांधकाम विभागात काळा बाजार? चौकशीची मागणी तीव्र  बाहेरील आयुक्तस्तरीय पथकाची मागणी

Next Post

यावल पंचायत समिती बांधकाम विभागात काळा बाजार? चौकशीची मागणी तीव्र  बाहेरील आयुक्तस्तरीय पथकाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..