Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

वाल्मिक कराडच्या लेकाचा फेसबुकपोस्टद्वारे इशारा ! सर्वांसमोर सर्व काही बोलणार!, सुशील कराड नेमका कोणता गौप्यस्फोट करणार ?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 28, 2026
in क्राईम
0

बीड:/प्रशांत बाफना मस्साजोग (जि. बीड) चे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या घटनेनंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या कारागृहात आहे. त्यातच प्रथम उच्च व त्यानंतर आता सर्वाच्च न्यायालयानेही वाल्मिक कराडचा जामिन अर्ज फेटाळल्याने कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराड हा प्रमुख सूत्रधार म्हणून पोलिस यंत्रणेचा अहवाल न्यायालयासमोर मांडण्यात आला आहे. वाल्मिक कराडकडून जामिनासाठी प्रयत्न होत आहेत. आधी सत्र न्यायालय त्यानंतर उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही कराडला दिलासा मिळालेला नाही. न्यायालयीन पातळीवर अपयश आल्याने कराड कुटुंबाची अडचण वाढली असतानाच आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने केलेल्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.

सुशील कराड याने आपल्या फेसबुक पोस्टवर ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार’ अशा आशयाची पोस्ट टाकली आहे. या पोस्टमुळे अनेक तर्क वितर्कांना उधान आले आहे. परळीतील व्यापारी महादेव मुंडे, संतोष देशमुख प्रकरणातील सर्व होणार का याची उत्सुकता आहे. यापैकी नेमक्या कोणत्या गुन्ह्याबाबत सुशील कराड काय बोलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाल्मिक कराडवर गंभीर स्वरुपाचे आरोप होत असून तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. न्यायालयाने जामीन नाकारताना गुन्ह्याचे गांभीर्य, तपासाची दिशा आणि पुरव्यांची शक्यता लक्षात घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अरोपीस तात्पुरता दिलासा देणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाचे मत आहे. दरम्यान, सुशील कराडच्या पोस्टनंतर सोशल मिडियावर चर्चेला उधान आले आहे . आता वाल्कि कराडचा मुलगा सुशील कराड नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना आहे. विशेष म्हणजे वाल्मिक कराडचा जामिन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर आज त्याच्या मुलाने केलेली ही फेसबुक पोस्ट व्हायरल केली आहे.

या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणाही सतर्क झाल्या असून, सुशील कराडकडून कोणते महत्वाचे खुलासे होतात का? याकडे त्यांचे बारकाईने लक्ष आहे. आगामी काळात या प्रकरणात नवे पुरावे समोर येतात का? आणि तपासाची दिशा बदलते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि सुशील कराडच्या पोस्टनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

Previous Post

कोरपावलीत बोगस डॉक्टरचा धुमाकूळ प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम अंतर्गत प्रकार, कारवाईनंतरही पुन्हा व्यवसाय

Next Post

दूध भेसळ प्रकरणाचा सखोल तपास करावा भाऊसाहेब पगारेमानवी अधिकार संरक्षण समितीची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी

Next Post

दूध भेसळ प्रकरणाचा सखोल तपास करावा भाऊसाहेब पगारेमानवी अधिकार संरक्षण समितीची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..