Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 29, 2026
in क्राईम
0

अत्याचार केला नाही, महिलेनेच उत्तेजीत केल्याचा आरोपीच्या वकिलाचा युक्तीवाद

पुणे/प्रशांत बाफना: ‘मी देवाचा आवतार आहे आणि जू पार्वती आहेस माझी’ असं म्हणत एका स्वयंघोषीत धर्मगुरुने एका 35 वर्षीय महिलेवर पुण्यात लॉजवर अत्याचार केल्याचा आरोपारून फरार बाबाला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित पिडित महिलेने वसई येथील माणिकपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा सगळा गुन्हा पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. ऋषिकेश वैद्य असे या स्वयंघोषित धर्मगुरू चे नाव आहे. पुणे पोलिसांनी वैद्य याला पिंपरी मधून अटक केली. वैद्य याच्यावर पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात महिलेवर अत्याचार केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडित महिला 35 वर्षाची असून पुण्यात वास्तव्यास आहे. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार 2023 मध्ये तिच्या आईची वसई येथील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती. त्याने पिडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने तिच्याशी मैत्री करून जवळीक केली. डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्यात आला.

यावेळी “ मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस” असे तिला सांगितले. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉज मध्ये गेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान, हे नाशिक मधील अशेाक खरात प्रकरण समोर आल्यानंतर पिडित महिलेने हिम्मत दाखवून आपल्या पतीला घडलेला प्रकार सांगितला. त्यांना बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि तिथून हा गुन्हा पुण्यात वर्ग झाला. शुक्रवारी दि.27 सकाळपासूनच पुणे पोलिसांचे विविध पथकं वैद्य याचा शोध घेत होते अखेर संध्याकाळी त्याला पिंपरी येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी स्वयंघोषित गुरू ऋषिकेश वैद्यला आज मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्याच्या वकिलाने महिलेवर अत्याचार केला नसल्याचा युक्तिवाद केला.

दरम्यान, महादेवाचा अवतार असल्याचे सांगून महिलेवर अत्याचार करणार्‍या ऋषिकेश वैद्य याला पुणे लष्कर कोर्टात आज हजर करण्यात आलं. ऋषिकेश वैद्य याने लैंगिक अत्याचार केला नसून महिलेने त्याला उत्तेजित केल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. ऋषिकेश वैद्य याला खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचाही दावा आरोपीच्या वकिलांनी केला. आता या प्रकरणात ऋषिकेश वैद्य याला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी ऋषिकेश वैद्य याचे वकिल पवन कुलकर्णी यांनी म्हटलं की, फिर्यादीने ऋषिकेश वैद्य याला फेसबुकवर मैत्रीची विनंती पाठवली होती, वैद्य याने लैंगिक अत्याचार केला नाही. तर महिलेने त्याला उत्तेजित केले. त्याचे मोबाईल सगळे घेतले आहेत. दोघांच्याही मोबाईलवर मेसेज आहे. लॉजवर गेले असे म्हटले आहे, तर सीसीटीव्ही चेक करावा, असा गुन्हा घडला नाही.

महिला स्वत:हून गेली आहे. आरेाप करणारी महिला 35 वर्षीय असून लग्न झालेलं आहे. आरेापीची पार्श्वभूमी चांगली आहे. धार्मिक प्रवचन करणारे आहेत. महिला एवढ्या गप्प का राहिल्या? गुंगीचे औषध देऊन म्हटलं आहे, तसे काही नाही. खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं आहे, असे वकील कुलकर्णी यांनी म्हटलं.

वकिल पवन कुलकर्णी पुढे म्हणाले की, ऋषिकेश वैद्य याची बाजू कोर्टात मांडली. सरकारी वकिलांनी 14 दिवस पोलिस कोठडी मागितली. परंतु आम्ही प्रत्येक गोष्टीचे खंडन करून त्यांनी असे कुठलेही कृत्य केलं नाही, असे आमचे म्हणणे आहे. घटना 2023 ते 2025 च्या दरम्यान घडली असून त्याला गुन्हा दाखल करण्यास उशीर का झाला, याचे सबब कारण सांगितलं नाही.

आरोपीचा भाऊ धनंजय वैद्य म्हणाले की आरोप चुकीचे आहेत. ते सगळे बनवण्यात आलं आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू, बाकी आमचे वकील न्यायालयात बाजू मांडती.

Previous Post

गाळमुक्त धरणांमुळे शिवाराला नवे जीवन!आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

Next Post

भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

Next Post

भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..