Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 3, 2026
in जळगाव, सामाजिक
0
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

जळगाव | प्रतिनिधी संजय निकम

जळगांव शहरातील हुडको परिसराच्या आसपास सुरू असल्याचे सांगितले जाणारे कथित अवैध देहविक्री व्यवसाय आणि पिंप्राळा हुडको यांचा वारंवार संबंध जोडला जात असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे. एखादी घटना ज्या ठिकाणी घडली आहे, त्या ठिकाणाचा स्पष्ट आणि अचूक उल्लेख न करता हुडकोचे नाव वापरणे म्हणजे संपूर्ण परिसराची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रकार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

एखाद्या अवैध व्यवसायाबाबत तक्रार किंवा पोलिसांची कारवाई झाली असल्यास बातमी अचूक ठिकाण, संबंधित व्यक्ती, अधिकृत नोंद आणि कारवाईच्या तपशीलावर आधारित असणे बंधनकारक आहे. घटना दुसऱ्या भागात घडली असताना पिंप्राळा हुडकोचे नाव जोडणे हा पत्रकारितेच्या जबाबदारीचा गंभीर भंग असून, अशा प्रकारामुळे सामान्य कुटुंबांच्या प्रतिष्ठेला थेट धक्का पोहोचत आहे.

हुडकोमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा अवैध व्यवसायांशी संबंध आहे, असा बेजबाबदार निष्कर्ष काढणे पूर्णपणे चुकीचे आणि निषेधार्ह आहे. एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला किंवा एखाद्या ठिकाणी बेकायदेशीर देहविक्री व्यवसाय आढळला, तरी त्यासाठी संपूर्ण परिसराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता येणार नाही. दोषींवर कारवाई करा; मात्र निरपराध नागरिकांना बदनाम करण्याचा अधिकार कोणालाही नाही.

घटना हुडकोच्या आसपासच्या दुसऱ्या भागात घडली असेल, तर बातमीत हुडकोचे नाव का वापरले जात आहे, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. केवळ बातमीला अधिक प्रसिद्धी मिळावी किंवा सनसनाटी निर्माण व्हावी म्हणून हुडकोचे नाव वापरले जात असेल, तर हा प्रकार तातडीने थांबवला पाहिजे. अशा चुकीच्या संदर्भामुळे परिसरातील रहिवाशांना सामाजिक गैरसमज, अवहेलना आणि बदनामीला सामोरे जावे लागत आहे.

बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित यंत्रणेची अधिकृत माहिती, पोलिसांची नोंद, पंचनामा, गुन्हा दाखल असल्यास त्याचा तपशील आणि घटनेचे अचूक ठिकाण तपासणे अत्यावश्यक आहे. घटना दुसऱ्या परिसरात घडली असेल, तर केवळ प्रसिद्धीसाठी हुडकोचे नाव वापरले जात आहे चुकीची माहिती प्रसिद्ध करणाऱ्यांनी तातडीने खुलासा करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पिंप्राळा हुडको किंवा आसपासच्या भागात अवैध दारूविक्री, अमली पदार्थांची विक्री अवैध वेश्या व्यवसाय किंवा अन्य बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मात्र, दोषींवर कारवाई करण्याऐवजी संपूर्ण परिसराची प्रतिमा मलीन करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही. या बदनामीचा थेट परिणाम महिला, विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य कुटुंबांवर होत आहे.

पिंप्राळा हुडकोचे नाव ज्या कथित अवैध व्यवसायांच्या घटनांशी जोडले गेले आहे, त्या सर्व घटनांची प्रशासनाने स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी. घटना नेमकी कुठे घडली, संबंधित व्यक्ती कोण आहेत, पोलिसांकडे अधिकृत नोंद आहे का, प्रत्यक्ष कारवाई झाली आहे का, बातमीत नमूद केलेले ठिकाण आणि अधिकृत कागदपत्रातील ठिकाण एकच आहे का, तसेच हुडकोचे नाव वापरण्यामागे नेमका हेतू काय, याची स्पष्ट पडताळणी झाली पाहिजे.

पिंप्राळा हुडको हा केवळ सनसनाटी बातम्यांसाठी वापरला जाणारा शब्द नाही. येथे अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे सन्मानाने राहत आहेत. मुले शिक्षण घेत आहेत, तर नागरिक विविध व्यवसाय आणि नोकऱ्या करत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या कथित गैरकृत्याचा ठपका संपूर्ण हुडको परिसरावर ठेवणे हा हजारो नागरिकांवर अन्याय आहे. अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे; पण त्याचवेळी त्या व्यवसायांशी कोणताही संबंध नसलेल्या नागरिकांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणेही प्रशासन आणि माध्यमांची जबाबदारी आहे.

एखाद्या वृत्तात पिंप्राळा हुडकोचा चुकीचा संदर्भ दिला गेला असेल किंवा अपुरी माहिती तपासून बातमी प्रसिद्ध झाली असेल, तर संबंधित माध्यमांनी तातडीने वस्तुस्थिती तपासून दुरुस्ती किंवा स्पष्टीकरण प्रसिद्ध करावे. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जितका महत्त्वाचा आहे, तितकीच चुकीची माहिती दुरुस्त करण्याची जबाबदारीही महत्त्वाची आहे.

लेख संजय निकम (पिंप्राळा हुडको)

Previous Post

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

Next Post

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Next Post
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..