Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 1, 2026
in क्राईम
0
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव प्रतिनिधी शेख जावीद
जळगाव शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामानंदनगर, मेहरूण, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल १ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीन, २ किलो ११४ ग्रॅम गांजा आणि दुचाकी असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एमआयडीसी पोलिसांच्या सहकार्याने पथकाने सापळा रचला.३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता दर्गा परिसरातील रस्त्यावर संशयित नूर मोहम्मद पटेल दुचाकीवरून येताना पोलिसांच्या हाती लागला. त्याची झडती घेतली असता १ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीन पावडर, २ किलो ११४ ग्रॅम गांजा आढळून आला. त्याच्याकडील सुझुकी बर्गमन दुचाकीसह हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जप्त केलेल्या इफेड्रीनची किंमत ९ लाख ८१ हजार ५०० रुपये, गांजाची किंमत १ लाख ५ हजार ७०० रुपये, तर दुचाकीची किंमत ३० हजार रुपये, अशी एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपये असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत जप्त पदार्थांमध्ये इफेड्रीन व गांजा असल्याचे निष्पन्न झाल्याचे वृत्त आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, इफेड्रीनचा स्रोत काय, तो कोणाला पुरवला जाणार होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गाणापुरे यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्याचे वृत्त आहे जळगाव शहरात अमली पदार्थांविरोधातील पोलिसांच्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, या कारवाईतून मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Previous Post

बापरे! बीडमध्ये ग्रामरोजगारसेवक 60 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला

Next Post

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

Next Post
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा - आदिवासी विकास परिषद आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

November 4, 2026
श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..