Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रावेर-यावल तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा : आमदार अमोल जावळे यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 3, 2026
in शासकीय
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
रावेर व यावल तालुक्यात आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठा तडाखा दिला. कापणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले असून गहू व मक्याच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रावेर-यावल परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आज झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः कहर केला. जोरदार वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या केळी बागा मोठ्या प्रमाणावर मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांपुढे गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
सुमारे पाऊण तास विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे वीज पुरवठाही खंडित झाला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये केळी बागांना मोठा फटका बसला आहे. सध्या अंधार असल्यामुळे नुकसानीचा नेमका अंदाज स्पष्ट झालेला नसून उद्यापासून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
उद्यापासून सकाळी लवकर पंचनामे : आमदार अमोल जावळे
वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला उद्यापासून सकाळी लवकर तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

भुसावळ–न्हावी रस्त्याच्या रुंदीकरणात परवानगीशिवाय वृक्षतोड; २० हजारांचा दंड वसूल ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; १३ एप्रिलला धरणे आंदोलनाचा इशारा

Next Post

एरंडगाव येथे पैशांच्या वादातून वडिलांकडून मुलीची कुऱ्हाडीने हत्या; दुसरी मुलगी जखमी

Next Post

एरंडगाव येथे पैशांच्या वादातून वडिलांकडून मुलीची कुऱ्हाडीने हत्या; दुसरी मुलगी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..