Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावलमध्ये वन विभागाची धडक कारवाई! सागवान लाकूड तस्करी उधळली

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 12, 2026
in क्राईम
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल वन विभागाच्या पश्चिम परिक्षेत्राने केलेल्या धाडसी कारवाईत विनापरवाना चोरट्या मार्गाने सागवान लाकडाची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर मोठी कारवाई करण्यात आली असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नायगाव–किनगाव मार्गावर रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित महिंद्रा पिकअप (MH 04 EL 7658) वाहन थांबवून तपासणी केली असता प्लास्टिक क्रेटखाली लपवून ठेवलेले सागवान जातीचे लाकूड आढळून आले.
तपासणीत सागवानाचे ०.१७७ घनमीटर (८ नग) लाकूड जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे ₹3,939/- इतकी आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत ₹5,25,000/- असून एकूण ₹5,28,939/- चा मुद्देमाल वन विभागाने ताब्यात घेतला आहे.
कारवाईदरम्यान वाहन चालकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. जप्त केलेले वाहन व लाकूड शासकीय काष्ठ आगार, यावल येथे जमा करण्यात आले आहे.
या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) यांनी प्रथम अहवाल क्र. ०६/२०२६, दि. ११ एप्रिल २०२६ नोंदवून भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ४१(२)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही धडक कारवाई उपवनसंरक्षक सौरिष सहाय व सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत प्रशांत जोशी (वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल पश्चिम) यांच्यासह विपुल पाटील, संजय इंडे, हरीपुरा परिमंडळ अधिकारी तसेच वनरक्षक हनुमंत सोनवणे, चेतन शेलार, अक्षय रोकडे, इंदल चव्हाण, मोहन कच्छवाह, आनंद तेली, श्रीमती सरला भोंगरे, श्रीमती सीमा भालेराव आदींचा सहभाग होता.
वन संपत्तीची चोरी रोखण्यासाठी वन विभाग सतर्क असून अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Previous Post

थोर समाजसुधारक क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयात उत्साहात साजरा

Next Post

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

Next Post

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..