Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 15, 2026
in शैक्षणिक
0

मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 7.30. ते 9 या वेळेत भारतरत्न तथा भारतीय संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती प्रमुख अतिथी तथा शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक ,व्याख्याते श्री.सुरेश कुलकर्णी,शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप,ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे,पर्यवेक्षिका सौ रमा तारे ,तसेच विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविक सौ.रेवती किन्हीकर यांनी केले.या प्रसंगी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी प्रसाद जैन,हर्षदा चौधरी,तृषा पाटील,प्रज्वल साळुंखे,खुशाल पाटील,गौरव साबळे,गौरव देशमुख,अर्णव गडे,सौरभ कोळी,सचिन पंडित,ऋषिकेश कोळी, आदी शालेय विद्यार्थांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मराठी,इंग्रजी भाषेतून सुंदर,भाषणे सादर केली.या वेळेस ज्येष्ठ शिक्षिका सौ.पद्मजा जोशी यांनी डॉ.आंबेडकर यांच्यावर सुरेल गीत सादर केले तर श्रीमती संपदा तुंबडे यांनी डॉ .बाबासाहेबांच्या कार्यावर आधारित स्वरचित कविता सादर केली.शिक्षक सौ.मनिषा वानखेडे व श्री.श्रीकांत घुगे यांनी बोधिसत्व डॉ.आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली.प्रमुख वक्ते श्री.सुरेश कुलकर्णी सर यांनी डॉ.बाबासाहेब यांच्या जीवन कार्याचा सविस्तर आढावा सादर करून त्यांनी शोषित,वंचित,कामगार,महिला यांच्या साठी केलेल्या कार्याची माहिती दिली.तसेच बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दीक्षा घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे सर यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सविस्तर माहिती होऊन त्यांना वाचन प्रेरणा मिळावी या हेतूने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके शालेय ग्रंथालयास भेट दिली.तसेच विद्यार्थांनी शील, प्रज्ञा, करुणा या गुणांची वाढ करून डॉ.बाबासाहेब यांच्यासारखे ज्ञानवंत होण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुनीता रोटे यांनी तर आभारप्रदर्शन सौ.संगीता कुलकर्णी यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.सोमनाथ महाजन ,सौ.कविता कुऱ्हाडे,श्री.राकेश चौधरी ,श्री दीपक पाटील व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

Previous Post

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

Next Post

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

Next Post

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..