Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

किंनगावात “महाराजस्व समाधान शिबीर”ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो लाभांचे वितरण

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 17, 2026
in शासकीय
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेच्या बळकटीकरण योजनेअंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी किंनगाव (ता. यावल) येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन मा. तहसीलदार, यावल श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, तालुका स्तरावरील कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरातून नागरिकांना थेट लाभ देत प्रशासनाने ‘आपल्या दारी सेवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
शिबिरातील ठळक कामगिरी :
जिवंत सातबारा वाटप
एकूण वारस नोंदी : 114
प्रातिनिधिक वाटप : 21
उत्पन्न दाखले वाटप – 9
शिधापत्रिका वाटप – 13
जात प्रमाणपत्र वाटप – 03
तुकडा शेरा कमी करण्याची कारवाई (७/१२ उतारा)
एकूण तुकडा सातबारा : 882
पात्र प्रकरणे : 694प्रातिनिधिक वाटप 17अधिवास (Domicile) व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र – 05, विशेष अर्थसाहाय योजना लाभार्थी – 08 लक्ष्मी मुक्ती सातबारा वाटप – 01, आदिवासी खातेदार नोंदी – 04, घरकुल लाभ – 02 आयुष्मान भारत कार्ड (आरोग्य विभाग) – 16,ट्रॅक्टर वाटप – 01
प्रशासनाची प्रभावी कामगिरी
या शिबिरातून महसूल, आरोग्य, सामाजिक न्याय, आदिवासी विकास आदी विविध विभागांनी एकत्रितपणे काम करत नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांना तत्काळ न्याय देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, तुकडा सातबारा प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात निपटारा करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
नागरिकांकडून समाधान व्यक्त
शिबिरात लाभ घेतलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा शिबिरांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
एकूणच, “महाराजस्व समाधान शिबीर” हे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करणारे ठरले असून, शासन सेवा गावपातळीवर पोहोचविण्याचा हा एक प्रभावी प्रयत्न असल्याचे चित्र दिसून आले.

Previous Post

राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा सचिवपदी निवड

Next Post

धक्कादायक वास्तव! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किनगाव PHC मध्ये रुग्णांचा जीव धोक्यात

Next Post

धक्कादायक वास्तव! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किनगाव PHC मध्ये रुग्णांचा जीव धोक्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..