Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल तालुक्यातील रस्ते कामांवर संतापाचा स्फोट! सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद विभागावर गंभीर आरोप

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 29, 2026
in शासकीय
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यात सुरू असलेल्या रस्ते व बांधकाम कामांबाबत मोठा गोंधळ उडाला असून, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या कामांच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाखो-कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही प्रत्यक्षात कामे निकृष्ट होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये दोन्ही विभागांतर्गत करण्यात आलेली रस्त्यांची कामे अल्पावधीतच उखडू लागली आहेत. ठिकठिकाणी खड्डे, निघालेला डांबर थर, बाजूला बसलेले रस्ते – हे चित्र सर्वत्र दिसत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने “हे काम झाले की फक्त कागदावर?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, मापदंड न पाळणे आणि तांत्रिक तपासणी न करणे हे प्रकार सर्रास सुरू आहेत. “काम सुरू असताना अनेक वेळा सूचना दिल्या, पण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले,” असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणात ठेकेदार आणि संबंधित विभागातील काही अधिकारी यांच्यात संगनमत असल्याचा गंभीर आरोपही होत आहे. दर्जा तपासणी न करता बिले मंजूर केली जात असल्याने भ्रष्टाचाराचा संशय अधिक बळावला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग दोन्ही ठिकाणी एकाच पद्धतीने निकृष्ट कामे होत असल्याने संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. “करदात्यांचा पैसा वाया घालवणाऱ्यांना सोडले जाणार नाही. दोषींवर तात्काळ कडक कारवाई झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांना काळ्या यादीत टाकावे, तसेच निकृष्ट दर्जाची सर्व कामे पुन्हा करून घ्यावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावल तालुक्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा ‘निकृष्ट कामांचा खेळ’ आता उघडकीस आला असून, प्रशासन यावर कठोर पावले उचलणार का, की पुन्हा एकदा डोळेझाक करणार? हा मोठा सवाल नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.

Previous Post

गरीब कार्यकर्त्यांना न्याय द्या; विधानपरिषदेत संधी देण्याची जोरदार मागणी!

Next Post

जनतेचा आधारवड हरपला; दिलीपराव लांडे पाटील यांचे निधन

Next Post

जनतेचा आधारवड हरपला; दिलीपराव लांडे पाटील यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..