Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर जाधव

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 1, 2026
in राजकीय
0

धुळे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)ची महत्त्वपूर्ण बैठक आज धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत माजी जि.प. सदस्य प्रभाकर जाधव यांची धुळे जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय नेते ना रामदासजी आठवले यांनी यापूर्वी जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. बैठकीत प्रभाकर जाधव यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. आपल्या कार्यकाळात सर्वसमावेशक पद्धतीने नवीन कार्यकारिणी गठित करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ते काम करतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या बैठकीस ज्येष्ठ नेते वाल्मीक दामोदर, माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, काकासाहेब रामभाऊ माणिक, एस.आर. बागुल, महेंद्र निळे, दीपक शिंदे, अमोल कबाडे, भरत आडगाळे, नयना दामोदर, सरला निकम, राजू बाबा शिरसाठ, सरपंच, कैलास आखाडे, संजय पाटोळे, बापुसाहेब ठाकरे,मनीबाबा खैरनार, गौतम खंडारे, संजय बैसाणे, कमलाकर मोहिते, भरत जाधव, भुषण पाटील, गवळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अपघातग्रस्त वाहन सोडण्यासाठी लाच घेताना दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात एक ताब्यात तर दुसरा फरार

Next Post

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मुकेश गुंजाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी; चर्मकार समाज बांधवांचे निवेदन

Next Post

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मुकेश गुंजाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी; चर्मकार समाज बांधवांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

September 5, 2026
आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

September 5, 2026
तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

September 5, 2026
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..