Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मुकेश गुंजाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी; चर्मकार समाज बांधवांचे निवेदन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 1, 2026
in सामाजिक
0

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

वरणगाव (ता. भुसावळ) : भुसावळ शहरात तसेच जळगाव जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत चर्मकार समाज बांधवांनी भुसावळ येथील मुकेश गुंजाळ यांच्याविरोधात वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुकेश गुंजाळ हे सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांच्या आक्षेपार्ह पोस्ट व वक्तव्यांमुळे आमदार समर्थक आणि चर्मकार समाजामध्ये द्वेषाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच समाजाबाबत अवमानकारक भाषा वापरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप समाज बांधवांनी केला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे समाजातील प्रत्येक घटकाला समानतेचे स्थान मिळाले असून अशा परिस्थितीत जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

या प्रकारामुळे शहरातील शांतता व सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी व समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चर्मकार समाज बांधवांनी केली आहे.

निवेदनावर समस्त चर्मकार समाज, वरणगाव शहर यांची स्वाक्षरी असून निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक, वरणगाव पोलीस स्टेशन यांना देण्यात आली आहे.

Previous Post

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर जाधव

Next Post

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल; 21 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

Next Post

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल; 21 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

November 4, 2026
श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..