Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनलाडजळगाव परिसरातील पाझरतलाव दुरुस्ती व गोळेगाव तलावाच्या मध्यम प्रकल्पाची मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 9, 2026
in शासकीय
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
: शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील नागरिक तथा शेतकरी प्रतिनिधी प्रमोदकुमार ताराचंद छाजेड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इमेलद्वारे निवेदन देत धनगर वस्ती व कोकटवाडी येथील पाझरतलाव दुरुस्तीची मागणी केली आहे. तसेच गोळेगाव येथील तलावाचे मध्यम प्रकल्पात रूपांतर करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत नसल्याने शेतकरी बांधवांचे जीवन पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. पाऊस वेळेवर व चांगला झाल्यास खरीप पिकातूनच शेतकऱ्यांची गुजराण होत असते. मात्र पाणीटंचाईमुळे दरवर्षी शेती आणि जनजीवनावर परिणाम होत आहे.
धनगर वस्ती व कोकटवाडी येथील पाझरतलावांचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच भिंतींमधून होणारा पाझर थांबविण्याची कामे झाल्यास परिसरातील विहिरींना अधिक काळ पाणी उपलब्ध राहू शकते. त्यामुळे शेतकरी, पशुपालक व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच गोळेगाव येथील सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या तलावाच्या दोन्ही बाजूंना डोंगररांग असल्याने पाणी साठवण क्षमता वाढविण्यास मोठी संधी असल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाने या तलावाचे मध्यम प्रकल्पात रूपांतर केल्यास आसपासच्या १५ ते २० गावांना याचा मोठा फायदा होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग हा पाणी व विकासाच्या बाबतीत दीर्घकाळ उपेक्षित राहिल्याची खंत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागामार्फत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रमोदकुमार छाजेड यांनी केली आहे.
चौकट“काम फक्त कागदावरच; तक्रारीनंतरही प्रशासनाकडून दखल नाही” – प्रमोदकुमार छाजेड
शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथील धनगरवस्ती पाझरतलावाच्या खोलीकरण कामात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप नागरिक तथा शेतकरी प्रतिनिधी प्रमोदकुमार ताराचंद छाजेड यांनी केला आहे. मागील वर्षी तलावाचे खोलीकरण झाल्याचे दाखविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नसून सर्व प्रकार केवळ कागदोपत्रीच झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“धनगरवस्ती येथील पाझरतलावाचे मागील वर्षी खोलीकरण फक्त कागदावरच झाले आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना अर्ज करूनही काहीही उपयोग झालेला नाही. अधिकाऱ्यांचा या भ्रष्टाचाराला सुप्त पाठिंबा असल्याने भ्रष्टाचार वाढत आहे,” असा आरोप प्रमोदकुमार छाजेड यांनी केला आहे

Previous Post

पाथर्डी शहरात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

Next Post

सामाजिक कार्यकर्ते विनोद सोळंकी यांना सन्माननीय डॉक्टररेट पदवी व महात्मा गांधी उत्कृष्टता सेवा पुरस्कार प्रधान

Next Post

सामाजिक कार्यकर्ते विनोद सोळंकी यांना सन्माननीय डॉक्टररेट पदवी व महात्मा गांधी उत्कृष्टता सेवा पुरस्कार प्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..