Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू वाघोदा-निंभोरा रस्त्यावर हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 9, 2026
in अपघात
0

रावेर(प्रतिनिधी)वाघोदा-निंभोरा रस्त्यावरील शनिमंदिराजवळ तसेच विजय बाजीराव पाटील यांच्या शेतालगत काल दुपारी सुमारे ४ ते ४.३० वाजेच्या दरम्यान आलेल्या भीषण वादळाने थैमान घालत एक दुर्दैवी घटना घडली.अचानक सुटलेल्या प्रचंड वेगाच्या वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेले मोठे झाड क्षणार्धात कोसळले आणि त्याचवेळी रस्त्याने मोटारसायकलवरून जात असलेल्या युवकावर झाड पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेत शैलेंद्र राजेंद्र मेढे (रा.रोझोदा,ता.रावेर)यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मोटारसायकलचा क्रमांक MH 19 EN 2515 असा आहे.अचानक आलेल्या वादळामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली होती.त्याचदरम्यान हे झाड कोसळल्याने काही क्षणातच आनंदी वातावरणावर शोककळा पसरली.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.झाडाखाली अडकलेल्या शैलेंद्र मेढे यांना नागरिकांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय सावदा येथे उपचारासाठी हलविले तद नंतर ग्रामीण रुग्णालय सावदा येथील डॉक्टरांनी तपासणी करून युवकास मृत घोषित केले.ही बातमी गावात पसरताच संपूर्ण परिसर हळहळला असून नागरिकांकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले.सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन,महसूल विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा व झाड हटविण्याची कार्यवाही सुरू केली.वादळामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.अचानक आलेल्या या भीषण वादळाने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Previous Post

सामाजिक कार्यकर्ते विनोद सोळंकी यांना सन्माननीय डॉक्टररेट पदवी व महात्मा गांधी उत्कृष्टता सेवा पुरस्कार प्रधान

Next Post

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल बांधवांच्या विकासासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन

Next Post

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल बांधवांच्या विकासासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

September 5, 2026
आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

September 5, 2026
तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

September 5, 2026
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..