Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

बफर स्टॉकच्या नावाखाली कांद्याचे भाव पाडण्याचा डाव; कांदा विकू नये, कोण काय म्हणाले पहा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 17, 2026
in राजकीय
0

शेतकर्‍यांनी सरकारला कांदा विकू नये : अनिल घनवट
अहिल्यानगर |प्रशांत बाफना

केंद्र शासनाने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली असली तरी ही खरेदी प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या हितासाठी नसून भविष्यात कांद्याचे वाढणारे दर नियंत्रित करण्यासाठी असल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते अनिल घनवट यांनी केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नाफेड किंवा एनसीसीएफला कांदा विकू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

केंद्र शासन महाराष्ट्रात १२३५ रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करणार आहे. शासनाकडून शेतकर्‍यांना योग्य दर मिळावा, या उद्देशाने खरेदी केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात भविष्यात कांद्याचे दर वाढल्यास ते कमी करण्यासाठी हा बफर स्टॉक तयार केला जात असल्याचे घनवट यांनी म्हटले आहे. शासनाच्या उद्देशपत्रातही महागाई नियंत्रणासाठी हा साठा केला जाणार असल्याचे  नमूद असल्याचा दावा त्यांनी केला.

घनवट यांनी म्हटले की, एक क्विंटल कांदा उत्पादनासाठी शेतकर्‍यांना किमान दोन हजार रुपये खर्च येतो. त्याशिवाय साठवणुकीसाठी प्रति किलो पाच रुपये खर्च करावे लागतात. असे असताना १२३५ रुपये प्रति क्विंटल दराने निर्यातक्षम दर्जाचा कांदा खरेदी करणे म्हणजे शेतकर्‍यांचे नुकसान असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात दर वाढल्यानंतर हाच कांदा बाजारात आणून भाव पाडले जातील, त्यामुळे शेतकर्‍यांनी सरकारला कांदा विकू नये, असे आवाहन त्यांनी केले.नाफेड व एनसीसीएफमार्फत होणार्‍या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शयता असल्याचाही आरोप त्यांनी केला.

चांगल्या दर्जाचा कांदा कमी दराने खरेदी करून नंतर खुल्या बाजारात विकला जातो आणि त्याऐवजी निकृष्ट दर्जाचा कांदा शासनाला दिला जातो, असा प्रकार पूर्वी घडल्याचे त्यांनी नमूद केले. काही व्यापारी, अधिकारी, पुढारी आणि संबंधित घटकांच्या संगनमतातून हे प्रकार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.सध्या कांद्याला दर नसल्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, वाढत्या तापमानामुळे कांदा खराब होण्याची शयता वाढली असून साठवणुकीचा खर्चही वाढत आहे. पुढील काही महिन्यांत कांद्याचे दर वाढण्याची शयता असल्याने शेतकर्‍यांनी संयम ठेवून सरकारी खरेदीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहनही घनवट यांनी केले आहे. दरम्यान, सरकारने कांदा खरेदीचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

Previous Post

रावेर तालुक्यातील मोरव्हाल गावात तीव्र पाणीटंचाई, ग्रामस्थांचे पाण्याअभावी जीवन विस्कळीत पाण्यासाठी महिलांची पायपीट

Next Post

बापरे…! १८ दिवसांनी भारतातला इंधनसाठा संपणार…? अमेरिका- इराण – इस्रायल युद्धाचा आपल्या देशावर गंभीर परिणाम होणार…? नक्की काय परिस्थिती आहे, सविस्तर वाचा आणि चिंताग्रस्त न होता जाणून घ्या…!

Next Post

बापरे…! १८ दिवसांनी भारतातला इंधनसाठा संपणार…? अमेरिका- इराण – इस्रायल युद्धाचा आपल्या देशावर गंभीर परिणाम होणार…? नक्की काय परिस्थिती आहे, सविस्तर वाचा आणि चिंताग्रस्त न होता जाणून घ्या…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..