Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 31, 2026
in शासकीय
0

​अहिल्यानगर (प्रशांत बाफना):

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात वरिष्ठ कार्यालयाची पूर्वपरवानगी न घेता पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना परस्पर इतर शाखा किंवा विशेष पथकांमध्ये ‘संलग्न’ (Attach) करण्याच्या प्रवृत्तीला पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मोठा चाप लावला आहे. अशा प्रकारे परस्पर संलग्न केलेले सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना तात्काळ मूळ नेमणुकीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे थेट आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करून त्यांच्या गोपनीय अहवालात (CR) तशी नोंद केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.

​ काय आहे नेमके प्रकरण?

​अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील काही पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) तसेच अपर पोलीस अधीक्षक (Addl. SP) हे जिल्हा पोलीस प्रमुखांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, केवळ मौखिक किंवा लेखी आदेशाचा आधार घेऊन आपल्या अधिनस्त पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष पथक किंवा कार्यालयीन कामकाजाच्या नावाखाली परस्पर ‘अटॅच’ करून घेत असल्याचे पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आले होते.

​ही बाब प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत अयोग्य आणि शासन नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वीही २४१६ आणि २०२५ मध्ये याबाबतचे वरिष्ठ कार्यालयाचे संदर्भ व आदेश जारी करण्यात आले होते, मात्र तरीही ही प्रथा सुरूच राहिल्याने अखेर पोलीस अधीक्षकांनी हे कडक पाऊल उचलले आहे

Previous Post

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

Next Post

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

Next Post

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..