Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 7, 2026
in क्राईम
0
रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

रावेर | प्रतिनिधी : आदित्य गजरे -रावेर तालुक्यातील अजंदा गावाजवळील रेल्वे पुल परिसरात बांधकाम ठेकेदाराला मजूर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत शेतात नेऊन चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व ऑनलाइन व्यवहाराद्वारे लूट करणाऱ्या तिघा आरोपींना रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक करून गुन्ह्याचा पर्दाफाश केला. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.या प्रकरणी शेख जाबीर शेख अमान (वय ४१, रा. चिनावल) यांनी रावेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी हे बांधकाम ठेकेदार असून कामासाठी मजूर शोधत असल्याची माहिती आरोपींनी हेरली होती. मुख्य आरोपी शेख मुस्तकीम याने मजूर मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादींना विवरा येथे बोलावून घेतले. त्यानंतर अजंदा रेल्वे पुलाजवळ नेऊन साथीदारांच्या मदतीने शेतात बोलावले. तेथे चाकूचा धाक दाखवत फिर्यादींकडील रोख रक्कम हिसकावण्यात आली. त्यानंतर मोबाईल काढून फोनपेचा पिन जबरदस्तीने जाणून घेत विविध व्यवहारांद्वारे सुमारे आठ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली रावेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. रात्रीच्या अंधारामुळे आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसतानाही मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने मुख्य आरोपी शेख मुस्तकीम याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर शेख मोईन शेख नईम व फैजल बेग हितायत बेग या दोघांनाही अटक करण्यात आली.आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच-१९-ईडी-५५८० क्रमांकाची दुचाकी तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेला शेख मोईन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारच्या लुटीचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीने आणखी काही लुटीचे गुन्हे केले असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ जुलै २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली. अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना गजाआड करण्यात आल्याने रावेर पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

Next Post

मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

Next Post
मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

September 5, 2026
आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

September 5, 2026
तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

September 5, 2026
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..