Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री बीडमध्ये असतांना 45 लाखांची लाच स्विकारली!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 31, 2026
in क्राईम
0
उपमुख्यमंत्री बीडमध्ये असतांना 45 लाखांची लाच स्विकारली!

बीड/प्रशांत बाफना
: पाचशे, हजार नव्हे तर तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड येथील सामाजिक वनीकरण विभागातील अधिकार्‍यास रंगेहाथ पकडले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने शुक्रवारी (दि.31) सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई बीड जिल्ह्यात असतांना अधिकार्‍याने एवढी मोठी लाच घेण्याची हिंमत केली आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

श्रीनिवास लखमवाड असे सामाजिक वनीकरण विभागातील लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. लखमवाड याने सन 2025-26 मधील वृक्षलागवडीची बिले मंजूर करून देण्यासाठी, कर्मचार्‍यांचे थकीत वेतन अदा करण्यासाठी तसेच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी 45 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी सापळा रचला. यावेळी श्रीनिवास लखमवाड याला 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. यामध्ये पाच लाख रुपये खर्‍या नोटा व बाकी मनोरंजन(खोट्या नोटा) बँक मधील नोटा स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टिमने केल्यानंतर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे बीडमध्ये दाखल झाल्या आहेत

Previous Post

१५० कोटींच्या पाळधी-तरसोद बायपासवर भ्रष्टाचार खचला की रस्ता? उद्घाटनाची शाई वाळतेय तोच रस्त्याची दैना; अपघातांचा तांडव वाढला!

Next Post

उत्तम हजारे – पत्रकारितेतला “उत्तम” मार्गदर्शक उत्तम

Next Post
उत्तम हजारे – पत्रकारितेतला “उत्तम” मार्गदर्शक उत्तम

उत्तम हजारे – पत्रकारितेतला "उत्तम" मार्गदर्शक उत्तम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

September 5, 2026
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..