Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सातपुडा माध्यमिक विद्यालयात शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करा; मनविसेचे निवेदन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 13, 2026
in जळगाव
0
सातपुडा माध्यमिक विद्यालयात शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करा; मनविसेचे निवेदन

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर

नायगाव : सातपुडा माध्यमिक विद्यालय, नायगाव येथे शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. संजय देवरे सर तसेच स्थानिक संस्था चेअरमन संभाजी पाटील आणि व्हाईस चेअरमन एल. बी. पाटील यांना शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

सध्या विद्यालयाच्या सकाळच्या सत्रात इयत्ता ५ वी ते ७ वीकरिता केवळ तीन शिक्षक व एक शिक्षिका कार्यरत आहेत. तर दुपारच्या सत्रात इयत्ता ८ वी ते १० वीकरिता तीन शिक्षक व एक शिक्षिका कार्यरत आहेत. विशेषतः इंग्रजी, गणित आणि शारीरिक शिक्षण (P.T.) या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनावर परिणाम होत आहे.

शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या भवितव्याशी तडजोड होऊ नये, यासाठी विद्यालयात किमान तीन पात्र शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

याबाबत योग्य कालावधीत कार्यवाही करून शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, संजय सुक्राम नन्नवरे, मंगलाबाई गणेश सावळे, विकास कोळी, योगेश कोळी, वैभव चौधरी, मरुबाई तडवी, हलमाबाई तडवी, सोनाबाई सोनवणे, सकीनाबाई तडवी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

“विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड नाही; शिक्षक मिळेपर्यंत मनविसेचा लढा सुरूच राहील!” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

एसपी साहेब, सॅल्युट! पेटू पाहणारं नगर शहर मिनिटात थांबवलं!महापालिका आयुक्तांना भूमिका बदलावी लागणार । बहिष्काराची अन्‌‍ दर्पोक्तीची भाषा वापरणाऱ्यांवर आता कारवाई होणार का?

Next Post

आचार्यश्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त राहुरी फॅक्टरीत महाप्रसादाचे आयोजन

Next Post
आचार्यश्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त राहुरी फॅक्टरीत महाप्रसादाचे आयोजन

आचार्यश्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त राहुरी फॅक्टरीत महाप्रसादाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..