
उपसंपादक मन्सूर तडवी
रावेरदिनांक कुसुंबा,लोहारा,गोरखेडाकुंभारखेडा,चिनावल मार्गावर विद्यार्थ्यांसाठी तात्काळ एस.टी. बस सेवा सुरू करावी, या मागणीचे निवेदन आज दिनांक १/९/ २६ रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने रावेर आगार व्यवस्थापनाला देण्यात आले.
बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांचे मोठे हाल होत आहेत. बस सेवा लवकर सुरू न केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला.
यावेळी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सलीम तडवी, जिल्हा सचिव जहाँगिर तडवी, नशीर तडवी, सर्फराज तडवी, बबीताताई तडवी, नशीर दादा तडवी भातखेडा, हबीब तडवी आदी उपस्थित होते.







