Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सुनेत्रा पवार यांच्याबाबत आमदार रोहित पवार यांचे बीडमध्ये मोठं विधान, म्हणाले त्यांनी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 24, 2026
in राजकीय
0
सुनेत्रा पवार यांच्याबाबत आमदार रोहित पवार यांचे बीडमध्ये मोठं विधान, म्हणाले त्यांनी

बीड/प्रशांत बाफना
: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी बीडच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला. सुनेत्रा पवार यांनी दुष्काळी परिस्थितीत दौरे केले पाहिजेत. केवळ कागदी दौरे न करता दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, असा रोखठोक सल्ला देखील दिला.

आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाले

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. माध्यमांशी संवाद साधताना आमदार पवार म्हणाले, मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. या स्थितीत सरकारने शेतकऱ्यांना 50000 रुपये हेक्टरी मदत द्यावी. सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी दौरा केलाच पाहिजे. त्यांचे मंत्री भरणे मामा दौरा करत आहेत. शेतकरी त्यांना विचारात आहेत. त्यावेळी ते मला कोणतेही अधिकार नसल्याचे सांगतात. तुम्हाला अधिकार नसतील तर मंत्री करून काय उपयोग झाला? स्वाभिमानी असाल तर सरकारची साथ सोडा आणि रस्त्यावर या, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला. इतकंच नाही तर लोकांच्या बाजूने लढा आणि सरकारला गुडघ्यावर आणून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या, असे रोहित पवार यांनी सल्ला दिला.

‘असं दौऱ्याचं नाटक करून चालणार नाही’

दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री व बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी देखील दुष्काळी परिस्थितीमध्ये दौरा केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत. इकडे मुख्यमंत्री दौरा करत आहेत परंतु बॅरिकेट लावत आहेत, मेटल डिटेक्टर लावत आहेत, असं दौऱ्याचं नाटक करून चालणार नाही, तुम्ही घरी जावा, एसीमध्ये बसा, ऑफिसमध्ये बसा, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. शेतकऱ्यांना 50000 रुपये हेक्टरी मदत द्या व मजुरांना 25000 रुपये मदत द्या, अशी आमची मागणी आहे.. ती मान्य होईपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.

रोहित पवारांनी जालन्यात जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या…

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली. डोमेगाव आणि दूनगाव परिसरातील शेतांमध्ये जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी रोहित पवार यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. पावसाअभावी खरीप पिकांवर झालेला परिणाम, पिकांची झालेली नुकसानस्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची त्यांनी माहिती घेतली. अंबड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याची भूमिका रोहित पवार यांनी यावेळी मांडली

Previous Post

खिर्डी येथील घरफोडींचा निंभोरा पोलिसांकडून उलगडा ..पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..

Next Post

आ .कर्डिलेंचा जनता दरबार नागरिकांचे व्यासपीठघरगुती वादापासून प्रशासकीय प्रश्नांची केली जाते सोडवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..