Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

धक्कादायक! बीड हादरले, स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार? 7 ठिकाणाहून ग्राहकांसह महिला-तरुणी ताब्यात

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 2, 2026
in क्राईम
0
धक्कादायक! बीड हादरले, स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार? 7 ठिकाणाहून ग्राहकांसह महिला-तरुणी ताब्यात

बीड/प्रशांत बाफना बीड शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एकाच वेळी 7 स्पा सेंटरवर छापा टाकला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार सुरू असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी अनेक महिला- तरुणी आणि ग्राहकांना ताब्यात घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या मोठ्या कारवाईमुळे बीड शहर हादरले आहे. पोलिसांनी एकाच वेळी 7 स्पा सेंटरवर छापा टाकला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली अश्लील कृत्य सुरू असल्याने पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. बीड शहर आणि शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल सात स्पा सेंटर्सवर पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकून अनेक महिला आणि पुरुष ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! बीड हादरले, स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार?

अशी झाली कारवाई

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, स्पा सेंटरच्या नावाखाली आक्षेपार्ह आणि अश्लील कृत्ये चालत असल्याचा संशय पोलिसांना होता. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक नवनीत कंवत यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने ही विशेष मोहीम राबवली. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी अचानक सात ठिकाणी छापे टाकून तेथील संदिग्ध महिला व ग्राहकांना ताब्यात घेतले.

वैद्यकीय तपासणी अन् पुढील कारवाई

कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व महिला आणि पुरुष ग्राहकांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि पोलिसांच्या सखोल चौकशीअंती संबंधित स्पा सेंटर्समध्ये नक्की काय प्रकार सुरू होता, याचा उलगडा होणार आहे.

दरम्यान, एकाच दिवशी आणि एकाच वेळी सात स्पा सेंटर्सवर टाकलेल्या या छाप्याने बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस अधिक तपास करत आहेत

Previous Post

हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ -दोन लाखाची मागणी पतीसह पाच जणांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात अभिवादन

Next Post
गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात अभिवादन

गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..