
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला व लोकपरंपरेची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सादरीकरणातून ओळख व्हावी, तसेच आपल्या पारंपरिक कला-संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या हेतूने शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात नुकतेच आयोजित लोककला प्रशिक्षण शिबिर विद्यार्थांच्या जोरदार प्रतिसादात जल्लोषात संपन्न झाले.
या शिबिरामध्ये खानदेशातील लोककलेचे अभ्यासक व लोककलावंत शाहीर श्री विनोद ढगे तसेच बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष श्री.योगेश शुक्ल ,उपाध्यक्ष श्री.पंकज बारी,कोषाध्यक्ष श्री.सचिन महाजन ,प्रवक्ता श्री.हर्षल पवार व त्यांचे सहकारी श्री.अवधूत दलाल,श्री.गजानन साळुंखे,श्री.शालिग्राम रेणुके ,श्री.विलास दलाल यांनी आकर्षक वेशभूषा करून शाहिरी पोवाडा, गोंधळ, भारुड, पारंपरिक लोकगीते व विविध लोककलांचे प्रत्यक्ष प्रभावीपणे सादरीकरण विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत मार्गदर्शन केले. तसेच ढोलकी, संबळ आदी पारंपरिक वाद्यांच्या साथीने लोककलावंतांकडून आपल्या लोकपरंपरेचा जागर विद्यार्थ्यांना जल्लोषात अनुभवण्यास मिळाला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या मातीत रुजलेल्या लोककलेचा प्रत्यक्ष अनुभव मिळून लोककला, लोकपरंपरा आणि संस्कृतीच्या जतनाची उत्तम प्रेरणा मिळाली.
या उपक्रमात शालेय विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपल्या समृद्ध लोककला व लोकपरंपरेची माहिती जाणून घेतली.या उपक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनिषा पवार यांनी तर आभार प्रदर्शन सौ.यामिनी चौधरी यांनी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. उल्हास ठाकरे,श्री.योगेश शुक्ल तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री संजय वानखेडे,पर्यवेक्षक सौ रमा तारे,श्री.जगदीश साळुंखे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले.







