Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या स्वराने जिल्हास्तर बुद्धिबळ स्पर्धेत मिळवले यश,विभागीय स्तरासाठी निवड.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 17, 2025
in शैक्षणिक
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा परिषद जळगाव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत निर्मल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु. स्वरा अश्विन वाघ हिने आपल्या अचूक विचारशक्ती, संयम आणि रणनीतीच्या जोरावर १४ वर्षे वयोगटात चमकदार विजयाची नोंद करत सर्वांचे लक्ष वेधले आहे या उत्कृष्ट कामगिरीमुळे स्वराची निवड आता जळगाव येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली असून ती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्वराच्या या यशामुळे शाळेत आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे संस्थेच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, उपप्राचार्य श्री. प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, व प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांनी स्वराचे मनःपूर्वक अभिनंदन करून विभागीय स्तरावरील यशासाठी शुभेच्छा दिल्या.स्वराच्या या विजयामागे क्रीडा शिक्षक श्री. गणेश मोरे, श्री. नंदू पाटील, श्री. प्रवीण मोरे आणि श्री. सोमनाथ माळी यांचे अथक परिश्रम, सततचे मार्गदर्शन व प्रेरणादायी प्रशिक्षण लाभले आहे.बुद्धिबळाच्या पटावर प्रत्येक चाल विचारपूर्वक, प्रत्येक पाऊल योजनेनुसार खेळत स्वराने आपल्या चातुर्य, आत्मविश्वास आणि शांततेच्या जोरावर विजयाची ‘चेकमेट’ साधली आहे. तिचा हा विजय केवळ वैयक्तिक नाही, तर निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवत्तापूर्ण क्रीडा संस्कारांचेही द्योतक आहे.

Previous Post

नगरदेवळा जि.प.उर्दू शाळेत अब्दुल कलाम दिन आणि वाचन प्रेरणा दिवस साजरा

Next Post

शेतकर्‍यांची दिवाळी गोड करापाचोर्यात महाविकास आघाडीचे रस्तारोखो आंदोलन आणि तहसीलदारांना निवेदन

Next Post

शेतकर्‍यांची दिवाळी गोड करापाचोर्यात महाविकास आघाडीचे रस्तारोखो आंदोलन आणि तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..