Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

हिंगोणा-सावखेडा जिल्हा परिषद गटात “जनता सेवेसाठी” अमित तडवी यांची उमेदवारी निश्चितजनतेतून आणि युवक वर्गातून उमेदवारीसाठी जोरदार मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 19, 2025
in राजकीय
0

उपसंपादक मन्सूर तडवी

हिंगोणा-सावखेडा जिल्हा परिषद गटातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या गटात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे श्री. अमित सिराज तडवी एक तरुण, शिक्षित आणि प्रामाणिक कार्यकर्ते, ज्यांची ओळख “जनतेचा माणूस” म्हणून झाली आहे. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या समस्यांना आवाज देणाऱ्या या कार्यकर्त्याच्या उमेदवारीसाठी स्थानिक जनतेत आणि युवक वर्गात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमित तडवी हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटना व सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, महिला सबलीकरण, क्रीडा, सांस्कृतिक आणि माहिती अधिकार पत्रकार अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली असून, शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या पात्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. विशेषतः निराधर, विधवा, अनाथ, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेले त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद ठरले आहेत.

त्यांच्या पुढाकाराने गावोगावी जनजागृती शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, शैक्षणिक मार्गदर्शन उपक्रम, तसेच माहिती अधिकार मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. शासनाचे विविध लाभ योजनांचे दरवाजे त्यांनी सामान्य जनतेसाठी खुले केले, यामुळेच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिक, मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या मते

“अमित तडवी हे केवळ राजकारणी नाहीत, तर लोकांसाठी लढणारा खरा जनसेवक आहेत.
त्यांच्या शांत, संयमी आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे युवक वर्ग त्यांच्यामागे भक्कमपणे उभा आहे. महिलांमध्येही त्यांच्या कामाबद्दल आत्मीयता असून, अनेक स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आहे.

यापूर्वी चोपडा विधानसभा निवडणूक लढवून त्यांनी राजकीय क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. अपार लोकसहभाग आणि प्रामाणिक कार्यनिष्ठेमुळे आज हिंगोणा-सावखेडा गटात त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

अमित तडवी यांचे कार्य हे गौरव, प्रामाणिकपणा आणि जनहिताची दिशा दाखवणारे आहे. राजकीय क्षेत्रात स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कार्यपद्धती आणि समाजाशी असलेली बांधिलकी यामुळेच त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावोगावी, चौकाचौकात आणि युवकांच्या चर्चांमध्ये एकच नारा घुमतोय  “जनतेचा माणूस अमित तडवीच हवेत!”

स्थानिक नागरिकांचा ठाम विश्वास आहे की, जर अमित तडवींना संधी मिळाली, तर ते विकासाचे आणि पारदर्शक प्रशासनाचे नवे पर्व सुरू करतील. त्यांचे जनतेशी असलेले नाते हे केवळ राजकीय नाही, तर भावनिक आहे आणि हीच त्यांची खरी ताकद आहे.

जनतेचा उमेदवार, लोकाभिमुख नेतृत्व आणि सेवाभावी कार्यकर्ता  हिंगोणा-सावखेडा गटात आगामी निवडणुकीत अमित तडवीचं नाव सर्वांच्या चर्चेत आहे.

Previous Post

शेतकर्‍यांची दिवाळी गोड करापाचोर्यात महाविकास आघाडीचे रस्तारोखो आंदोलन आणि तहसीलदारांना निवेदन

Next Post

हिंगोणा सावखेडा गटात जिल्हा परिषदेसाठी फिरोज तडवी सज्ज

Next Post

हिंगोणा सावखेडा गटात जिल्हा परिषदेसाठी फिरोज तडवी सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

July 7, 2026
भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

July 7, 2026
सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

July 7, 2026
मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

July 7, 2026
रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

July 7, 2026

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..