Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पतीच्या अपहरणाचा कट; पोलिसांनी केला भांडाफोड, फिर्यादीच निघाला आरोपी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 8, 2025
in क्राईम
0

अहिल्यानगर / प्रशांत बाफना
भलत्याच व्यक्तींना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पतीच्या अपहरणाचा खोटा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार नगर तालुका परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी, ‘अपहृत’ पती, त्याची पत्नी, वडील, सासू आणि सासरे अशा एकूण पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुद्द पोलिसांनीच याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

​याबाबत अधिक माहिती अशी की, २५ ऑक्टोबर रोजी हातवळण (ता. अहिल्यानगर) येथून तुकाराम महादेव यादव याचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, तपासात पोलिसांना वेगळाच संशय आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुकाराम महादेव यादव (आरोपी क्र. १) याचे मुळात अपहरण झालेच नव्हते.

​त्यानेच हा संपूर्ण बनाव रचला आणि यामध्ये त्याची पत्नी सुमन तुकाराम यादव, वडील महादेव सावळेराम यादव (दोघे रा. हातवळण), सासरे रामदास उध्दव सोनसाळे व सासू सिंधुबाई रामदास सोनसळे (दोघे रा. शेंडी) यांनी त्याला साथ दिली. या सर्वांनी संगनमत करून तुकाराम याला लपून राहण्यास मदत केली.

​एवढ्यावरच न थांबता, आरोपी सुमन यादव हिने पोलीस ठाण्यात एक वाढीव तक्रार (हकीगत) दिली. यामध्ये तिने, “गणेश कवडे, माऊली पठारे, सुनिल दिलीप पठारे व अक्षय भंडारे (सर्व रा. बनपिंप्री, ता. श्रीगोंदा) यांनी आपल्या पतीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने उचलून नेले,” अशी खोटी माहिती दिली.

​या चौघांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावी व त्यांचे मोठे नुकसान व्हावे, याच उद्देशाने हा संपूर्ण खोटा कट रचण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
​हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर, पोलीस उपनिरीक्षक भरत बाजीराव धुमाळ यांनी स्वतः याप्रकरणी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून, नगर तालुका पोलिसांनी आरोपी तुकाराम यादव, सुमन यादव, महादेव यादव, रामदास सोनसाळे आणि सिंधुबाई सोनसळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Previous Post

खळबळजनक! हत्येच्या कटात मुंडेंचा हात; मुंडे म्हणाले त्यांची आणि माझी

Next Post

मृत पतिला न्याय मिळावा म्हणून लहान मुलांना सोबत घेत पत्नीचे व पालकांचे आमरण उपोषण.!

Next Post

मृत पतिला न्याय मिळावा म्हणून लहान मुलांना सोबत घेत पत्नीचे व पालकांचे आमरण उपोषण.!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

July 7, 2026
भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

July 7, 2026
सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

July 7, 2026
मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

July 7, 2026
रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

July 7, 2026

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..