Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सांगवी बु. गावात नागरिकांनी नदीपात्रात उतरून केली स्वच्छता!ग्रामपंचायतीच्या निष्क्रियते मुळे नागरिकांमध्ये संताप**

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 9, 2025
in सामाजिक
0

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

सांगवी बु — गावातील नदीपात्रात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाण साचलेली असून, ग्रामपंचायतीकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबवली आहे.

नदीपात्रात साचलेल्या घाणीमुळे डेंगू, मलेरिया आणि इतर साथीचे आजार पसरू शकतात, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीकडे कचराकुंड्यांची योग्य व्यवस्था नसल्यामुळे तसेच स्वच्छतेसाठी असलेला ट्रॅक्टर वापरात न आणल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील तरुणांनी एकत्र येऊन नदीपात्र स्वच्छ करण्याचा निर्धार केला. या स्वच्छता मोहिमेत चंदू तायडे (मिस्त्री), सागर मेघे, अजय मेघे, विकास तायडे, समा तायडे,दीपक भालेराव,अजय सोनवणे,राहुल जयकर ,तसेच अनेक समाजसेवक आणि ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले.

स्वच्छता मोहिमेनंतर नागरिकांनी ग्रामपंचायतीला इशारा दिला की, जर तत्काळ कारवाई करून नियमित स्वच्छतेची व्यवस्था केली नाही, तर नदीपात्रातील कचरा थेट ग्रामपंचायतीच्या दालनात टाकण्यात येईल, असा कठोर इशारा सागर मेघे यांनी दिला आहे.

नागरिकांनी शासनाकडेही मागणी केली आहे की स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मिळणारा निधी योग्य पद्धतीने वापरला जावा आणि सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीकडून नियमित स्वच्छता मोहीम राबवली जावी.

Previous Post

धनंजय मुंडे विरोधात मराठा समाज आक्रमक; अटकेची मागणी मुंडे समर्थकांकडून प्रतिमेस दुग्धाभिषेक

Next Post

यावल नगरपालिका निवडणूक 2025निवडणुकीची बिगुल वाजला; प्रशासन सज्ज, उमेदवारांसाठी ‘वन विंडो’ सुविधा

Next Post

यावल नगरपालिका निवडणूक 2025निवडणुकीची बिगुल वाजला; प्रशासन सज्ज, उमेदवारांसाठी ‘वन विंडो’ सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..