Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 24, 2025
in क्राईम
0

अनंत गर्जेच्या घरासमोरच गौरीवर अंत्यसंस्कार, दोन्ही बाजुकडून शाब्दीक बाचाबाची

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय्य सहायक अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांच्या आरोपारून अनंत गर्जे यांच्या विरोधात वरळी पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अनंत गर्जे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास 27 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनंत गर्जेंची पत्नी डॉ. गौरी हिने मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच या दोघांचा विवाह झाला होता. मुलीच्या आत्महत्येनंतर गौरीच्या कुटुंबींयांनी अनंत गर्जेवर गंभीर आरोप केले. त्यामुळे कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अनंत गर्जेवर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती.

अनंत गर्जे यास रात्री उशिरा अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यास वरळी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, अनंत गर्जेंवर पत्नी गौरी पालवे-गर्जे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबीयांनी केला आहे. कोर्टाने अनंत गर्जेना 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या चार दिवसाच्या पोलिस कोठडीच्या चौकशीतून पोलिसांना काय नवी माहिती मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी थेट मुंबईतील वरळी पोलिस ठाणे गाठले आणि अनंत गर्जेंसह त्याच्या कुटुंबीयांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कुटुंबीय या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ते पालिस ठाण्यातून हलण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला.

अनंत गर्जेच्या घरासमोर अंत्यसंस्कार : गौरीच्या संतप्त कुटुंबीयांनी तिचा मृतदेह अनंत गर्जेच्या मूळ गाव असलेल्या मोहोज देवढे (ता. पाथर्डी जि.अहिल्यानगर) येथे नेला . तेथे अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. या अंत्यसंस्कारावेळी दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये ृबाचाबाची झाली. आत्महत्येपूर्वी गौरी आणि अनंत गर्जे यांच्यात भांडण झाले होते, त्यानंतर अनंत गर्जे कार्यक्रमासाठी बाहेर पडले होते. घरी परतल्यावर त्यांनी गौरीला मृत अवस्थेत पाहिले. अंजली दमानिया यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित करत गौरीला न्याय मिळण्याची मागणी केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत

Previous Post

माझी वस्ती, माझी जबाबदारी !गुलटेकडीतील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्धार “महापालिका निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी”

Next Post

वंचित बहुजन आघाडी जळगांव जिल्हयाचे दोन्ही माजी जिल्हाध्यक्ष यांचा रिपब्लिकन सेना मध्ये जाहीर प्रवेश

Next Post

वंचित बहुजन आघाडी जळगांव जिल्हयाचे दोन्ही माजी जिल्हाध्यक्ष यांचा रिपब्लिकन सेना मध्ये जाहीर प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..