Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

नगरच्या रेल्वे प्रकल्पांना गती द्या ; खासदार नीलेश लंके यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 6, 2025
in राजकीय
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना

अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील विविध महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांच्या प्रस्तावांची अद्ययावत स्थिती जाणून घेण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी केंद्राचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर पत्र लिहून पाठपुरावा अधिक वेगाने करण्याची मागणी केली आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या आठ प्रमुख रेल्वे प्रस्तावांवर लंके यांनी तातडीने अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे.

पुणे–अहिल्यानगर इंटरसिटी गाडी सुरू करण्याबाबत पूर्वी पाठवलेल्या प्रस्तावाची सद्यस्थिती कळविण्याची खासदारांनी मागणी केली आहे. या गाडीमुळे दोन्ही शहरांतील रोजगार, व्यवसाय आणि शिक्षणाच्या संधींना चालना मिळेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

अहिल्यानगर -चोंडी (जेउर–चोंडी) नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. या प्रस्तावाच्या अभ्यास व निर्णय प्रक्रियेची स्थिती तत्काळ कळवावी, अशी लंके यांची विनंती आहे.

संभाजीनगर–अहिल्यानगर–पुणे नवीन रेल्वे लाईन या बहुप्रतिक्षित नव्या रेल्वे मार्गाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप स्पष्ट स्थिती मिळालेली नाही. मार्गाचा सर्वेक्षण, डीपीआर, मंजुरी प्रक्रिया आणि पुढील टप्पे कोणत्या अवस्थेत आहेत, हे कळवण्याची विनंती खासदारांनी केली आहे.

श्रीरामपूर–परळी नवीन रेल्वे मार्ग या महत्वपूर्ण प्रस्तावावर रेल्वे मंत्रालयाने कोणता निर्णय घेतला आहे, हे तातडीने कळवावे, असे खासदारांनी म्हटले आहे.

राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वे लाईन या मंजूर रेल्वे मार्गासाठी भू-अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. भूसंपादन कधी आणि कशा पद्धतीने होणार याबाबत माहिती देण्याची विनंती त्यांनी केली आहे.

अहिल्यानगर स्थानकाजवळील एलसी क्र. ३० येथे आरओबी बांधकामाच्या प्रस्तावाची अद्ययावत स्थिती कळवावी, अशी मागणी खासदारांनी केली आहे. अपघातमुक्त वाहतुकीसाठी हा पूल अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे

चौकट
राहुरी तालुक्यातील बांबोरी येथे गेट क्रमांक ३५(ब) असलेल्या ठिकाणी आरओबी मंजूर झाल्याचे नमूद करून, काम सुरू होण्याची निश्चित तारीख कळवावी, अशी विनंती लंके यांनी केली आहे.

चौकट

सुपा औद्योगिक परिसरात रेल्वे फ्रेट यार्ड

एमआयडीसीमधील वाढत्या औद्योगिक प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर फ्रेट यार्ड अत्यावश्यक असल्याचे लंके यांनी नमूद केले आहे. फ्रेट यार्ड उभारणीच्या प्रस्तावाची स्थिती आणि पुढील प्रक्रिया स्पष्ट करावी, अशी मागणीही पत्रातून केली आहे

Previous Post

शनिशिंगणापूर देवस्थान घोटाळा…! अटकेतले ‘ते’ दोघे तर ‘हिमनगाचंच टोक’…! पोलीस खरंच ‘हिमनगा’पर्यंत पोहोचतील का? ‘सायबर’च्या कारवाईमुळे अनेकांना भरलीय धडकी…! 

Next Post

केडगावमध्ये बिबट्या? वनविभागाकडूून शोध मोहीम, पिंजरा लावण्याची तयारी

Next Post

केडगावमध्ये बिबट्या? वनविभागाकडूून शोध मोहीम, पिंजरा लावण्याची तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..