Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

धक्कादायक : रेशनच्या गहू, तांदळात सोनकिडे;

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 23, 2025
in क्राईम
0

धान्य गरिबांसाठी की जनावरांसाठी | संतप्त रेशनधारकांचा पुरवठा विभागाला सवाल | वाळकी गणातील गावांमधील प्रकार
अहिल्यानगर | प्रशांत बाफना

शासनाकडून नागरिकांना मिळणार्‍या रेशन धान्यात मोठ्या प्रमाणात सोनकिडे, कचरा, बारीक चुर निघत असल्याने हे धान्य जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे. वाळकी गणातील लाभार्थ्यांना रेशन धारकांकडून या धान्याचे वितरण झाले असून, नागरिकांच्या आरोग्याच्या जिवाशी पुरवठा विभाग खेळत असल्याने लाभार्थ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल बहिरट यांनी दिला आहे.
जल्ह्यातील गोरगरिब, दारिद्रयरेषेखाली असणार्‍या नागरिकांना केंद्र शासनाकडून अंत्योदय योजनेतून महिन्याला ३५ किलोंचे धान्य मोफत मिळते. यात गहू व तांदुळ याचा समावेश असतो. केंद्र शासनाकडून मिळणार्‍या या धान्याचे वितरण राज्य शासनाच्या पुरवठा विभागामार्फत केले जाते. धान्य वितरण प्रणाली व लाभार्थ्यांना धान्य योग्य प्रमाणात मिळते की नाही, याची सर्व जबाबदारी जिल्हा पुरवठा विभागावर आहे.

दर महिन्याला सर्व रेशन दुकानदारांकडून धान्याचे वाटप करण्यात येते. या महिन्यात वाळकी गणातील गावांमध्ये रेशन धान्याचे वाटप करण्यात आले असून, हे धान्य निकृष्ट प्रतीचे असल्याने लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तांदुळ व गव्हाला सोनकिडे लागले आहे. धान्याची बारीक चूर झाली असल्याने हे धान्य खायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. निकृष्ट प्रतीचे धान्य देऊ त्यांची चेष्टा चालविली आहे. रेशन दुकानदारांकडे तक्रार करून धान्य बदलून मिळाले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते बहिरट यांनी पुरवठा विभागावर संताप व्यक्त केला आहे. खराब धान्याचा पुरवठा बंद करून चांगले धान्य द्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Previous Post

जि. प. मराठी शाळा महेलखेडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार रोहित पवारांवर बरसले; पूर्वीच कल्पना दिली पण त्यांनी..

Next Post

माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार रोहित पवारांवर बरसले; पूर्वीच कल्पना दिली पण त्यांनी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..