Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

बीड हादरलं: दिवसाढवळ्या गोळीबार, धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या; आरोपी फरार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 6, 2026
in क्राईम
0

बीड : /प्रशांत बाफना शहरातील अंकुश नगर परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा दिवसाढवळ्या गोळीबार करून, त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे शांत असलेल्या बीड शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत तरुणाचे नाव हर्षद तुळशीदास शिंदे (वय अंदाजे ३० ते ३५) असे असून तो धानोरा रोड येथील हाउसिंग कॉलनीचा रहिवासी होता. हर्षद शिंदे हा बीड नगरपरिषदेत प्लंबर म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, अंकुश नगर परिसरात नगरपरिषदेच्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हर्षद शिंदे याच्यावर अचानक दोन वेळा गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर तो खाली कोसळला. त्यानंतरही हल्लेखोरानी त्याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने तोंडावर व शरीरावर वार करत अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

या हल्ल्यात हर्षद शिंदे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक पूजा पवार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल होते.

दरम्यान, हत्या कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी पिस्तुलीच्या दोन गोळ्या आढळून आल्या असून पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे.

फॉरेन्सिक प्रयोगशाळेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून तांत्रिक व सखोल तपास सुरू आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या गंभीर घटनेमुळे बीड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

Previous Post

तहसिलदारांना निलंबित करा; आंदोलनकर्ते आक्रमक, अन्यथा कायदा हातात घेऊन वाळूचे डंपर पेटवू

Next Post

घुसखोरांना शोधून डिपोर्ट करू, चेन्नइत महापौर जसा तमिळ, तसा मुंबईचा महापौरही मराठी, हिंदूच!- मुख्यमंत्री फडणवीस

Next Post

घुसखोरांना शोधून डिपोर्ट करू, चेन्नइत महापौर जसा तमिळ, तसा मुंबईचा महापौरही मराठी, हिंदूच!- मुख्यमंत्री फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..