Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 14, 2026
in शैक्षणिक
0

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर

ज्योती विद्या मंदिर, सांगवी बुद्रुक (ता. यावल) येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजामाता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी रेड रिबन क्लब व ग्रामीण रुग्णालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने NCC कॅडेट्ससाठी १०० मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात NCC अधिकारी श्री. पी. एम. भंगाळे यांनी राष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व विशद केले. युवकांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती व सेवाभाव निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
“उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” हा स्वामी विवेकानंदांचा संदेश आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
धावण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. अतुल फिरके यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
स्पर्धेच्या निकालात
मुलींच्या गटात वैष्णवी प्रकाश कोळी हिने प्रथम, हेमांगी सुपडू कोळी हिने द्वितीय तर नेहा विकास चौधरी हिने तृतीय क्रमांक पटकावला.
मुलांच्या गटात प्रणय भूषण पाटील प्रथम, अंश दिनकर सोनवणे द्वितीय व ज्ञानेश खिलचंद चौधरी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
विजेत्या व सहभागी NCC कॅडेट्सचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. भंगाळे यांनी केले. यावेळी श्री. वसंत संदानशिव (समुपदेशक, ICTC विभाग), श्री. पवन जगताप (लिंक वर्कर), श्रीमती कांचन चौधरी (समुपदेशक, RKSK), ग्रामीण रुग्णालय यावलचे पर्यवेक्षक श्री. सी. पी. फिरके तसेच भाऊसाहेब सतीश सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व विजेत्या कॅडेट्सना ट्रॉफी व प्रमाणपत्र, तर सहभागी कॅडेट्सना सहभाग प्रमाणपत्र रेड रिबन क्लबच्या वतीने देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार NCC कॅडेट तौसिफ तडवी यांनी मानले.

Previous Post

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

Next Post

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

Next Post

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता 'स्वराज्य शक्ती सेने'चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..