Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

बीडच्या ऊसतोड मजुराचे पाय बांधून दगडाने डोके ठेचून निर्घुन खून सातार्‍यातील भोसे गावातील घटना; आरोपी स्लीप बॉयच्या विरोधात गुन्हा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 22, 2026
in क्राईम
0

सातारा: /प्रशांत बाफना कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे ऊसतोड मजुराचे पाय बांधून दगडाने ठेचून खून करून मृतदेह शेतात टाकण्यात आला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी जरंडेश्वर शुगर मिलमधील स्लीप बॉय म्हणून काम करणार्‍या युवकावर कोरेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून कोणत्या कारणामुळे झाला हेक मात्र अद्याप समोर आले नाही.

मच्छिंद्र अंबादास भोसले (वय 42) रा. उखळवाडी (ता. शिरुर कासार, जि. बीड) असे खुन झालेल्या ऊसतोड मजुराचे तर अजय राजेंद्र माने रा. भासे (ता.कोरेगाव , सातारा) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नांव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मच्छिंद्र भोसले हे गेल्या तीन ते चार वर्षापासून ऊस तोडणीसाठी जरंडेश्वर शुगर मिलसाठी काम करत होते. यंदाही ते पत्नी व कुटुंबासह चिमणगाव (ता. कोरेगाव) परिसरात वास्तव्यास आले होते.

15 जानेवारी रोजी रात्री मच्छिंद्र भोसले यांना हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन जात असल्याचे सांगून स्लीप बॉय अजय माने याने त्यांना आपल्या शेतात नेले. तेथे पाय बांधून त्यांचा दगडाने डोके ठेचून निर्घुण खून केला. त्यानंतर मृतदेह ऊसाच्या शेतात टाकून दिला. दरम्यान,मच्छिंद्र भोसले घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने 17 जानेवारी रोजी कोरेगाव पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

त्यानंतर मंगळवारी सकाळी आरोपीचे वडील राजेंद्र माने शेतात गेले असता तेथे छिन्नविछिन्न अवस्थेत मच्छिंद्र भोसले याचा मृतदेह आढळून आला. सहायक पोलिस निरिक्षक प्रशांत हुले यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. भोसले यांच्या पत्नीकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अजय माने याच्यासोबत पती गेले होते.

असे सांगितले. पोलिसांनी तातडीने माने याच्याकडे रुग्णालयात जाऊन चौकशी करून या प्रकरणाचा उलगडा केला. मात्र, आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याने पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरिक्षक प्रशांत हुले हे पुढील तपास करत आहेत.

आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

खून केल्यानंतर आरोपी अजय माने याने भीतीपोटी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीनरे कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही काळ तो अतिदक्षता विभागात उपचार घेत होता. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांना खुनाबाबत कोणतीही माहिती नव्हती

Previous Post

मुंबईच्या महापौरपदी भाजप कोणाला संधी देणार! 40 वर्षानंतर भाजपला सत्तास्थापनेचा योग,चर्चेतील नावांचा बोलबाला

Next Post

दगडी येथे अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ९८ लाभार्थ्यांची मोफत तपासणी, निदान-उपचार व जनजागृती

Next Post

दगडी येथे अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ९८ लाभार्थ्यांची मोफत तपासणी, निदान-उपचार व जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..