Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा अपमान!पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीयावलमध्ये आंबेडकरी संघटनांचा संतप्त एल्गार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 29, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याच्या निषेधार्थ यावल तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ व भारतीय दंडसंहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात यावलचे तहसीलदार मोहनमाला नाझिरकर व यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांना आंबेडकरी चळवळीतील संघटना, बौद्ध समाज बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सविस्तर निवेदन देण्यात आले.
“हा विसर नाही, हा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे!”
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, बाबासाहेबांचे नाव न घेणे हा केवळ भाषणातील अपघात किंवा विसर नसून, तो संविधानाचा, बाबासाहेबांचा आणि कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे.
प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी संविधाननिर्मात्याचे नाव टाळणे म्हणजे दलित-वंचित समाजाच्या आत्मसन्मानावर घाला घालण्यासारखे आहे, अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली.
“भीमकन्यांचे धैर्याला सलाम!”
या घटनेविरोधात वनविभागातील कर्मचारी माधवी जाधव व दर्शना सौपुरे यांनी कार्यक्रमस्थळी निर्भीडपणे जाब विचारत आवाज उठवला. या दोन्ही भगिनींच्या धैर्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “या भीमकन्यांना संपूर्ण आंबेडकरी समाजाचा पाठिंबा आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्यभर आंदोलनाचा इशारा
जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.
“बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही… संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही!” अशी आक्रमक भूमिका संघटनांनी जाहीर केली आहे.
मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष भगवान मेघे, ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका अध्यक्ष सतीश अडकमोल यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत इंगळे, लक्ष्मी ताई मेंढे, सुपडू संदनशिव, नसीर खान, विकी वानखेडे, अरुण गजरे, मिलिंद जंजाळे, किरण तायडे, नितीन बोरेकर, विजय बाविस्कर, विनोद सोनवणे, सिद्धार्थ अडकमोल, बाळू अडकमोल, नरेंद्र अडकमोल यांच्यासह समता सैनिक दलाच्या महिला कार्यकर्त्या व यावल तालुक्यातील असंख्य आंबेडकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाची भूमिका काय?
या गंभीर प्रकरणावर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Previous Post

ब्रेकिंग न्यूज: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; बारामतीमध्ये झाला भीषण अपघात

Next Post

देवदूत’ की ‘दानव’? जळगावात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा!’हार्ट प्लस’च्या वासनांध डॉक्टरचा नर्सवर अत्याचार पती-पत्नीवर अखेर गुन्हा दाखल

Next Post

देवदूत' की 'दानव'? जळगावात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा!'हार्ट प्लस'च्या वासनांध डॉक्टरचा नर्सवर अत्याचार पती-पत्नीवर अखेर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

November 4, 2026
श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..