Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शेवटचं दर्शन मिळालं नाही, अजित दादाच्या चितेपुढे डोकं टेकवलं …

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 30, 2026
in देश-विदेश
0

बारामती: /प्रशांत बाफना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. 28 जानेवारीला विमान अपघातात त्यांचं निधन झालं. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अजित दादांवर अंत्यसंस्कार पार पडले. या अंत्यसंस्कारासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते,पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याच गर्दीत दादांचा लाडका सूरज चव्हाणही आला होता. सूरज चव्हाण जड अंत:करणाने अजित दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी पाहोचला होता. सूरजला दादांना अखेरचं पाहता आलं नाही शेवटी त्यांच्या जळत्या चित्तेसमोर त्यानं डोकं टेकवलं. काळीज पिळवटून टाणारा व्हिडीओ समोर आला आहे.

लाखोंच्या गर्दीत कोणी ओळखू नेय म्हणून सूरज चव्हाणने आपल्या चेहर्‍यावर रूमाल बांधला होता. इतर नागरिकांप्रमाणेच सूरज चव्हाण देखील रांगेत उभा राहून दादांच्या शेवटच्या दर्शनाची वाट पाहत होता.लाखोंच्या गर्दीत काणी ओळखू नेय म्हणून सूरज चव्हाणने आपल्या चेहर्‍यावर रूमाल बांधला होता. इतर नागरिकांप्रमाणे सूरज चव्हाण देखील रांगेत उभा राहून दादांच्या शेवटच्या दर्शनाची वाट पाहत होता.लाखोंच्या गर्दीत सूरजने शेटपर्यंत वाट पाहिली. गर्दी थोडी कमी झाल्यावर सूरज चव्हाण अजित दादांच्या अंत्यदर्शनासाठी पुढे गेला. सूरज चव्हाण ने दादांची अखेरची भेट घेऊपर्यंत खूप उशिर झाला होता. अजित दादांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला होता. त्यामुळे सूरजला दादाचं शेवटचं दर्शन घेता आलं नाही. अत्यंत जड अंत:करणाने सूरज चव्हाणने दादांच्या जळत्या चितेसमोरच डोकं टेकवलं.

अंत्यसंस्कारानंतर सुरज चव्हाणने सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना शब्दांत व्यक्त केल्या, त्याने पोस्टमध्ये लिहिलं, “ आई-वडिलांनंतर मी तुमच्यात माझे आई-आप्पा पाहात होतो आणि तुम्ही पण मला सोडून गेलात. आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं सूरजचा व्हिडीओ, त्याचं दादांवरचं प्रेम, त्यांना भेटण्यासाठीची तळमळ हे सगळं पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले आहेत.

सूरज चव्हाण आणि अजित पवार याचं अत्यंत भावनिक नातं होतं. अजित दादांना तो देव मानायचा. आई-वडिलांसाख्या मायेच्या नजरेने पाहत होता. दादांनी सूरज चव्हाणला एक नवं आयुष्य उभं करून दिलं. सूरज चव्हाणला बारामतीच्या मोढवे गावात त्याचं हक्काचं घर बांधून दिलं. सूरज चव्हाण तसंच अभिनेता रितेश देशमुख देखील अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचला होता. रितेशनं त्याच्या बिग बॉसच्या शूटींगमधून वेळ काढून अजित दादांना शेवटचा निरोप दिला

Previous Post

यावल तालुक्यात ‘कागदी’ ग्रामसभा! लोकशाहीची थट्टा की प्रशासनाची मिलीभगत?

Next Post

साकळीचा गौरवरशियातील कुर्बान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीतून मोईझ खान इरफान खान प्रथम प्रयत्नात MBBS उत्तीर्ण साकळी गावातून मुस्लिम समाजातील पहिले डॉक्टर

Next Post

साकळीचा गौरवरशियातील कुर्बान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीतून मोईझ खान इरफान खान प्रथम प्रयत्नात MBBS उत्तीर्ण साकळी गावातून मुस्लिम समाजातील पहिले डॉक्टर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..