Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मुख्यालय सोडून ‘अपडाऊन’वर वन अधिकारी-वनपाल?जंगल सुरक्षा धोक्यात, नागरिकांमध्ये संताप

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 9, 2026
in शासकीय
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात गंभीर प्रकार समोर येत असून, अनेक ठिकाणी वन अधिकारी व वनपाल हे नियुक्त करण्यात असताना मुख्यालयावर न राहता बाहेरून ये-जा करत असल्याच्या तक्रारी जोर धरत आहेत. वनसंवर्धन, अवैध वृक्षतोड रोखणे, वनआग नियंत्रण आणि गस्त यासाठी २४ तास उपलब्ध राहणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अधिकारी मुख्यालयात अनुपस्थित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींच्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे जंगल परिसरात देखरेख कमकुवत झाली आहे. याच संधीचा फायदा घेत काही ठिकाणी अवैध वृक्षतोड, मुरूम उत्खनन व अतिक्रमणाच्या हालचाली वाढल्याचा आरोप होत आहे. आपत्कालीन घटनांच्या वेळी अधिकारी तात्काळ उपलब्ध नसल्याने प्रतिसाद उशिरा मिळतो, अशीही तक्रार पुढे येत आहे.
शासन नियमांनुसार वन विभागातील फील्डवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नियुक्त कार्यक्षेत्र किंवा मुख्यालयात राहणे बंधनकारक मानले जाते. मात्र या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न आता चर्चेत आला आहे. “जंगल वाचवायचे कोण — कागदावरील यंत्रणा की प्रत्यक्ष उपस्थित अधिकारी?” असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.
परिसरातील ग्रामस्थांनी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी करण्याची तयारी सुरू केली असून, अचानक तपासणी मोहीम राबवावी, उपस्थिती नोंदी तपासाव्यात आणि मुख्यालयात वास्तव्यास नसलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Previous Post

इचखेडा मार्गावरील खालकोट वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड? वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी तीव्र

Next Post

सौ.यशश्री देवकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश ‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या KYC साठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ

Next Post

सौ.यशश्री देवकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश ‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या KYC साठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..