Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

समता सैनिक दलाची जळगाव जिल्ह्यात भक्कम संघटनात्मक बांधणी; शहर कार्यकारणी जाहीर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 23, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
समता सैनिक दलच्या जळगाव जिल्हा बांधणीसाठी संघटनेची खंबीर वाटचाल सुरू असून २० फेब्रुवारी रोजी जळगाव महानगर व तालुकास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत शहर कार्यकारणी जाहीर करत जिल्हाभर शाखा विस्ताराचा निर्धार करण्यात आला.
बैठक राज्याध्यक्ष मा. धर्मभूषण बागुल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच राज्य संघटक विजय निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संघटनेची ऐतिहासिक वाटचाल, संघर्ष, शिस्त आणि तत्वनिष्ठा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
संघटनेचे संस्थापक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार घराघरात व गावागावात पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. सर्व जाती-धर्मातील व्यक्तींना संघटनेत सामावून घेऊन समाजात समता, संघटन आणि जागर निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.
देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक तालुका व प्रत्येक गावात समता सैनिक दलाच्या शाखा स्थापन करण्याचे आवाहन राज्याध्यक्ष बागुल यांनी केले. संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा पश्चिम मुख्य संघटकपदी आयु. चेतन नन्नवरे यांची निवड जाहीर करण्यात आली.
जळगाव शहर कार्यकारणी जाहीर
अध्यक्ष — मुकुंद भालेराव
सचिव — संजय सपकाळे
संघटक — सुधाकर बाविस्कर
संघटक — कल्पना ब्राह्मणे
संघटक — अनिता कापुरे
संघटक — सिद्धार्थ सोनवाने
प्रचारक — गौतम सोनवणे
प्रचारक — प्रतिभा घोडेस्वार
प्रचारक — सुधीर सैंदाणे
या बैठकीस जिल्हा पदाधिकारी व विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संघटन विस्तार, विचार प्रसार आणि युवकांना जोडण्यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला असून जळगाव जिल्ह्यात समता सैनिक दलाच्या संघटनात्मक विस्ताराला आता अधिक वेग मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
जिल्हाभर शाखा विस्ताराचा निर्धार — समता सैनिक दलाची संघटनात्मक ताकद वाढणार!

Previous Post

यावल पंचायत समिती बांधकाम विभागात काळा बाजार? चौकशीची मागणी तीव्र  बाहेरील आयुक्तस्तरीय पथकाची मागणी

Next Post

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..