Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

भिंगारमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी ; पाच जण जखमी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 10, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना-भिंगार परिसरातील यशवंत नगर येथे दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत पाच जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरूध्द फिर्यादी दिल्याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी (7 मार्च) रात्री यशवंत नगर परिसरात काही तरूणांमध्ये वाद सुरू होता. हा वाद मिटवण्याच्या प्रयत्नात दोन्ही गटांमध्ये अचानक हाणामारी झाल्याची माहिती आहे.

विकास मधुकर शिंदे (वय 45, रा. यशवंत नगर, भिंगार) यांनी दिलेल्या जबाबावरून करण खरे, अर्जुन खरे, शक्ती वैद्य, आकाश लोट (सर्व रा. यशवंत नगर, भिंगार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विकास शिंदे हे आपल्या मुलाला होत असलेली मारहाण थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेले असता संशयित आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. आकाश लोट याने लोखंडी सळईने विकास यांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना जखमी केल्याचे व त्यांची पत्नी, मुलगा, मुलीला मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.दरम्यान, दुसर्‍या बाजूने करण मुकेश खरे (वय 26, रा. डेअरी फार्म, यशवंत नगर, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास मधुकर शिंदे, प्रेम विकास शिंदे (दोघे रा. हनुमान मंदिरामागे, डेअरी फार्म, यशवंत नगर, भिंगार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण खरे यांच्या घरासमोर आरडाओरडा ऐकू येत असल्याने तेथे त्यांचे वडिल वाद सोडविण्यासाठी गेले. तेथे संशयित आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी त्यांच्या वडिलांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याचे व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही बाजूंकडून दिलेल्या फिर्यादींवरून कॅम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत

Previous Post

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर ;कारण आलं समोर….

Next Post

गुंड चिंग्या मोरेची धिंड; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

Next Post

गुंड चिंग्या मोरेची धिंड; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

July 7, 2026
भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

July 7, 2026
सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

July 7, 2026
मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

July 7, 2026
रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

July 7, 2026

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..