Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

साकळी ग्रामपंचायतीत पुन्हा वादाची ठिणगी!राजस्व अभियान शिबिराच्या बॅनरमधून महिला उपसरपंच व आदिवासी महिला सदस्यांचा फोटो गायब; सन्मान की राजकीय दिखावा?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 14, 2026
in राजकीय
0

उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली असून ग्रामपंचायतीच्या बॅनरमुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिराच्या निमित्ताने ग्रामपंचायतीमार्फत लावण्यात आलेल्या स्वागत बॅनरमध्ये ग्रामपंचायतीच्या महिला उपसरपंच तसेच एका आदिवासी महिला सदस्याचा फोटोच गायब असल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दिनांक १४ मार्च रोजी साकळी येथील भवानी माता मंगलकार्यालया समोर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मोठे स्वागत बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर सरपंच व काही सदस्यांचे फोटो ठळकपणे झळकत असताना महिला उपसरपंच आणि एक आदिवासी महिला ग्रामपंचायत सदस्य यांचा फोटो मात्र पूर्णपणे गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा केवळ “चुकून झालेला प्रकार” की जाणीवपूर्वक केलेली राजकीय डावपेचबाजी, असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच महिला दिनानिमित्त साकळी येथे मोठ्या थाटामाटात कार्यक्रम आयोजित करून महिलांच्या हाती एक दिवसासाठी ग्रामपंचायतीचा कारभार देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला होता. परंतु त्या कार्यक्रमानंतर अवघ्या काही दिवसांतच ग्रामपंचायतीच्या अधिकृत बॅनरमधून लोकनियुक्त महिला उपसरपंच आणि आदिवासी महिला सदस्य यांना डावलण्यात आल्याने हा सन्मान फक्त दिखाव्यासाठी होता का? असा सवाल आता गावभर चर्चेत आहे.
यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही दोन्ही महिला प्रतिनिधी सरपंचांच्या पॅनलमधूनच निवडून आलेल्या असल्याची माहिती समोर येत आहे. तरीही बॅनरमध्ये त्यांचा फोटो न घेण्यामागे नेमका कोणाचा आदेश होता? बॅनर तयार करताना त्यांना मुद्दाम वगळण्यात आले का? की ग्रामपंचायतीतील अंतर्गत राजकीय वादाचे हेच खरे रूप आहे? अशी चर्चा गावात जोर धरू लागली आहे.
शासनाच्या महत्वाच्या उपक्रमात स्थानिक राजकारणाचा शिरकाव होत असल्याची तीव्र टीका ग्रामस्थांकडून केली जात आहे. महिला सन्मानाच्या गप्पा मारणारेच महिला प्रतिनिधींना बॅनरमधून गायब करतात, ही मोठी शोकांतिका आहे, असेही काही नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बॅनर तयार करताना जबाबदार असलेल्या व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करावी तसेच सरपंच आणि संबंधित पदाधिकाऱ्यांनी तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
या घटनेमुळे सध्या साकळी गावातील राजकीय वातावरण चांगलेच तपाण्याची शकता असून महिला प्रतिनिधींचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे. पुढील ग्रामसभा किंवा बैठकीत या मुद्द्यावर मोठा गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
साकळी ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या या नव्या वादामुळे महिला सन्मानाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष कृती यामधील दरी पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा गावभर रंगू लागली आहे.

Previous Post

नावरे फाट्यावरील ‘जिवघेणा’ गतिरोधक! अपघातांची मालिका सुरू; प्रशासन मात्र गाढ झोपेत?

Next Post

कोरोना योद्ध्यांची पुन्हा नोकरीसाठी धडपड!जळगावात स्मार्ट कंपनीवर वशिल्याबाजीचा आरोप; पालकमंत्र्यांना निवेदन

Next Post

कोरोना योद्ध्यांची पुन्हा नोकरीसाठी धडपड!जळगावात स्मार्ट कंपनीवर वशिल्याबाजीचा आरोप; पालकमंत्र्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..