Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 16, 2026
in शासकीय
0

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी

​अहिल्यानगर/प्रशांत बाफना,: २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी दि. २३ एप्रिल रोजी मतदान तर ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ व ३३ (१) (ओ) नुसार मतदारसंघात कोणत्याही व्यक्तीस गैरकृत्य करण्यास दि. ४ मे २०२६ पर्यंत मनाई करणारे आदेश जारी केले आहेत.

​आदेशानुसार मतदारसंघामध्ये कोणत्याही व्यक्तीस रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी गैरशिस्त वर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोणत्याही मिरवणुका, रॅली, सभा ठरविलेल्या मार्गाव्यतिरिक्त नेण्यास तसेच दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त आणि वेळेव्यतिरिक्त इतर मार्गाने नेण्यास व वेळेचे उल्लंघन करण्यास मनाई आहे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी आणि प्रार्थनास्थळांच्या आसपास प्रार्थनेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावरील किंवा सार्वजनिक जागी लोकांनी एकत्र जमण्याच्या ठिकाणी गर्दी करण्यास किंवा अडथळा निर्माण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

​सर्व रस्त्यांवर, रस्त्यामध्ये, घाटात, घाटावर, सर्व धक्क्यांवर किंवा धक्क्यामध्ये, जत्रा, देवालय, मशीद, दर्गा आणि सार्वजनिक लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागांमध्ये गोंधळ घालण्यास, बेशिस्तपणे वागण्यास मनाई आहे. कोणत्याही रस्त्यात, रस्त्याजवळ किंवा अनियमित व विनापरवाना सार्वजनिक जागी वाद्ये वाजवण्यास, गाणी म्हणण्यास, ढोल-ताशे वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ, कोणत्याही उपाहारगृहात ध्वनिक्षेपकाचा विनापरवाना वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

​याबाबत कोणास सवलत अगर परवानगीची आवश्यकता असल्यास २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे

पोटनिवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर,:- राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. तसेच संपूर्ण मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह संबंधित पोलीस व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त सर्व अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय राखत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी.

निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महसूल व निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवावे. संबंधित भागांत गस्त वाढवून नाकाबंदी प्रभावीपणे राबवावी आणि संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

मतदान पथके थेट मतदान केंद्रांवर पोहोचणार असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत मतदान यंत्रे केंद्रांवर पोहोचवली जाणार आहेत. या यंत्रांसोबत आवश्यक पोलीस बंदोबस्त देऊन ती विहित वेळेत मतदान केंद्रांवर पोहोचतील, यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या

Previous Post

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

Next Post

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

Next Post

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..